Nilkamal Passenger Boat Accident : नौदलाच्या स्पीड बोट वरील चालकावर गुन्हा दाखल

54
Nilkamal Passenger Boat Accident : नौदलाच्या स्पीड बोट वरील चालकावर गुन्हा दाखल
  • प्रतिनिधी 

गेटवे ऑफ इंडिया येथून एलिफंटा गुफा येथे निघालेल्या प्रवासी बोट अपघातप्रकरणी कुलाबा पोलीस ठाण्यात नौदलाच्या स्पीड बोटवरील चालकाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी दुपारी ४ वाजण्याचा सुमारास गेटवे ऑफ इंडिया पासून ५ नॉटिकल माईल्स अंतरात समुद्रात झालेल्या प्रवासी बोट आणि नौदलाच्या स्पीड बोटची धडक होऊन झालेल्या अपघातात नौदलाच्या स्पीड बोटवरील ४ जणांसह १३ जण मृत झाली असून ९२ जखमी झाले होते. जखमींपैकी दोन जण गंभीर असून इतरांची प्रकृती स्थिर आहे, तर दोन जण अद्याप बेपत्ता असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. दरम्यान प्रवासी बोटची अधिकृत क्षमता ९० प्रवाशांची असताना बोटीत १०० पेक्षा अधिक प्रवासी घेण्यात आले होते. याबाबत देखील चौकशी सुरू असल्याची माहिती पोलीस उपायुक्त (परिमंडळ १) डॉ. प्रवीण मुंढे यांनी दिली. (Nilkamal Passenger Boat Accident)

(हेही वाचा – Border-Gavaskar Trophy : भारतीय संघ ब्रिस्बेन मधून मेलबर्नला रवाना)

मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया येथून समुद्र सफारीसाठी तसेच मांडवा, एलिफंटा गुफा या ठिकाणी जाण्यासाठी प्रवासी बोटी आणि फेरी बोटी मोठ्या प्रमाणात आहेत. दररोज मुंबई तसेच मुंबई बाहेरून आणि परदेशातून येणारे हजारो पर्यटक या बोटींमधून समुद्र सफारीचा आनंद घेत असतात. बुधवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास निलकमल ही प्रवासी बोट ९० प्रवाशांची क्षमता असतानाही १०० पेक्षा अधिक प्रवाशांना घेऊन घारापुरी बेट (एलिफंटा) येथे निघाली होती. गेटवे ऑफ इंडिया पासून ५ नॉटिकल माईल्स समुद्र अंतरावर प्रवासी बोटीला भरधाव वेगात असलेल्या नौदलाच्या एका स्पीड बोटने जोरदार धडक दिली. ही धकड एवढी भीषण होती, की स्पीड बोटवरील नौदलाचा एक कर्मचारी स्पीड बोटवरून थेट प्रवासी बोटवर येऊन आदळला. या धडकेने निलकमल ही प्रवाशी बोट कलंडली आणि समुद्रात बुडू लागली. प्रवासी बोटवरील अनेकांनी घाबरून समुद्रात उड्या टाकल्या. पर्यटकांचे शोध व बचाव कार्य तटरक्षक दल आणि सागरी पोलिसांच्या समन्वयाने तातडीने हाती घेण्यात आले. मुंबई पोलिसांचे पथक, चार नौदल हेलिकॉप्टर, ११ नौदल क्राफ्ट, एक तटरक्षक नौका आणि तीन सागरी पोलीस नौका बचावकार्य करित होत्या. सर्व बचाव यंत्रणांमार्फत निलकमल बोटीवरील व नौदल क्राफ्टवरील एकूण १०५ लोकांना बाहेर काढण्यात आले व त्यांना जेएनपीटी, आयएनएचएस संघांनी रुग्णालय करंजा, सेंट जॉर्ज रुग्णालय, अश्विनी नौदल रुग्णालय येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले. १०५ पैकी १३ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये नौदलाच्या स्पीड बोटवरील चार जणांचा समावेश आहे. (Nilkamal Passenger Boat Accident)

(हेही वाचा – Amol Kirtikar यांची याचिका न्यायालयाने फेटाळली; वायकरांची खासदारकी कायम)

या प्रकरणी कुलाबा येथे निलकमल प्रवासी बोटला बुधवारी नेव्हीच्या बोटने धडक दिली. या प्रकरणी कुलाबा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात २ जण बेपत्ता आहे. नौदलाच्या स्पीड बोटवरील चालकावर आम्ही भरधाव वेगाने बोट चालवून १३ जणांच्या मृत्यूला कारणीभूत असल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त डॉ. प्रवीण मुंडे यांनी दिली. अपघातानंतर नौदलाने स्पीड बोट ताब्यात घेतली. संबंधित बोटीच्या तपासासाठी मुंबई पोलीस मागणी करणार असून बोटीची तपासणी करण्यासाठी मुंबई पोलीस प्रयत्न करणार असल्याची माहिती मुंढे यांनी दिली. मॅरिटाइम बोर्डाने दिलेल्या परवानगीनुसार निलकमल बोटीवर फक्त ९० जणांची क्षमता आहे. मात्र बोटीत १०० पेक्षा अधिक प्रवासी होते अशी माहिती समोर आली असून या प्रकरणी बोटीची सर्व कागदपत्रे पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत. तपास सुरू असल्याचे पोलीस उपायुक्त डॉ. मुंढे यांनी सांगितले. (Nilkamal Passenger Boat Accident)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.