एखादा गुन्हा, चोरी, दरोडा (Crime) यासारख्या घटना घडल्यानंतर तक्रार नोंदवायला पोलिस ठाण्यात गेल्यास तिथल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची वाट पाहत बसावे लागल्याचे अनुभव अनेकांचे आहेत. काहींनी पोलिस स्टेशनची पायरी चढण्याचीही भीती असतेच. पण आता तक्रार नोंदवण्यासाठी पोलिस ठाण्यात गेलेच पाहिजे, याची गरजच राहिलेली नाही. जिल्हा पोलिस अधीक्षकांनी आजपासून (२० फेब्रुवारी) क्यू आरकोड (QR Code) स्कॅन करून तक्रार नोंदवण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे.
प्रत्येक जिल्ह्यासाठी स्वतंत्र कोड
तक्रार नोंदवल्यावर२४ तासांत आवश्यक ती कार्यवाहीकरण्याची जबाबदारीही यंत्रणेने घेतली आहे. तक्रार नोंदवल्यावर पोलिसांचा प्रतिसाद कसा राहिला, या संदर्भात तक्रारदार यंत्रणेला गुणही देऊ शकेल. प्रसिद्ध करीतअ सलेला हा क्यूआर (QR Code) कोड जिल्हाभरासाठी आहे. प्रत्येक जिल्ह्यासाठी मात्र स्वतंत्र कोड (QR Code) असेल. तो मोबाइलद्वारे स्कॅन केल्यावर तक्रार दाखल करण्यासाठी एक फाॅर्म उघडेल. तो भरून सबमिट केला की तक्रार थेट मुख्यालयात दाखल होईल. (QR Code)
महाविद्यालयांच्या परिसरातही क्यूआर कोड
शाळा, महाविद्यालये, वर्दळीच्याठिकाणी टवाळखोरांकडून मुली, महिलांची छेड काढली जाते. चोरटेसक्रिय असतात. अशावेळी ही प्रक्रिया महत्त्वाची ठरणार आहे. शाळा, महाविद्यालयांच्या परिसरातही क्यूआर कोड दर्शनी भागात बसवले जातील. कारवाई झाल्यावर तसे संबंधिताना कळवलेही जाईल. (QR Code)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community