Nuh violence : नूह हिंसाचारामधील आरोपी एन्काऊंटरमध्ये जखमी

203
Nuh violence : नूह हिंसाचारामधील आरोपी एन्काऊंटरमध्ये जखमी

मिळालेल्या माहितीनुसार, नूह हिंसाचारातील (Nuh violence) आरोपीचे पोलिसांनी एन्काऊंटर केले आहे. समोरासमोर चकमकीनंतर नूहच्या गुन्हे शाखेने आरोपी आमीरला अटक केली. तो धिडारा तावडू येथील रहिवासी आहे. चकमकीनंतर त्याला तावडू येथील अरवली डोंगराच्या भागातून अटक करण्यात आली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चकमकीदरम्यान (Nuh violence) त्या आरोपीच्या पायाला गोळी लागली. त्यानंतर त्याला उपचारासाठी नल्हार मेडिकल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. झडतीदरम्यान पोलिसांनी त्याच्याकडून देशी बनावटीचे अवैध पिस्तूल आणि ५ काडतुसे जप्त केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री (२१ ऑगस्ट) १०:३० वाजता ही चकमक झाली. नूह गुन्हे शाखेचे (Nuh violence) निरीक्षक अमित यांना माहिती मिळाली की हिंसाचारात सहभागी असलेला एक आरोपी अमीर डोंगराच्या भागात लपलेला आहे. माहिती मिळताच पथक घटनास्थळी पोहोचले तेव्हा आरोपींनी गोळीबार केला. त्यानंतर सीआयए टीमने प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला. चकमकीत आरोपीच्या उजव्या पायाला गोळी लागली.

(हेही वाचा – Abortion : बलात्कार पीडितेला सर्वोच्च न्यायालयाकडून गर्भपाताची परवानगी)

१२ दिवसांपूर्वी झाली चकमक, एक आरोपी जखमी

सुमारे १२ दिवसांपूर्वी नूंह (Nuh violence) येथे पोलिस हिंसाचारातील आरोपींसोबत चकमक झाली होती. २ दंगलखोर राजस्थानातून तावडू मार्गे नूंहला येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यानंतर पोलिसांच्या पथकाने त्यांना तावडू टेकडीवर रोखण्याचा प्रयत्न केला. आरोपींनी पोलिसांवर गोळीबार सुरू केला. दोन्ही बाजूंनी सुमारे ५ राऊंड फायर झाल्या. सुमारे तासभर चाललेल्या चकमकीनंतर पोलिसांनी गावरका येथील रहिवासी मुनफेद आणि सायकुल यांना अटक केली. या चकमकीत मुनफेदला गोळी लागली.

आतापर्यंत २८० जणांना अटक

नूंह (Nuh violence) येथील ब्रजमंडल यात्रेदरम्यान झालेल्या हिंसाचारप्रकरणी आतापर्यंत ६१ एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. त्यात २८० जणांना अटक करण्यात आली आहे. याशिवाय सोशल मीडियावर अफवा पसरवणाऱ्या १२ जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून एकाला अटक केली आहे. नूहचे एसपी नरेंद्र बिजार्निया म्हणाले की, नूहमध्ये अफवा पसरवणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.