मुंबई पोलिसांकडून नायलॉन मांजा विक्री (Nylon Manja Accident) प्रकरणी २५ डिसेंबर ते १४ जानेवारी दरम्यान राबविण्यात आलेल्या कारवाईत मुंबई शहरासह उपनगरात मांजा विक्रेत्यांवर ९२ गुन्हे दाखल करण्यात आले असून ५२ जणांवर अटकेची कारवाई करण्यात आली असल्यची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.
(हेही वाचा – Ayodhya Ram Mandir vs Congress workers : अयोध्येत भाविक आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी)
मांजा विक्रेत्यांवर ९२ गुन्हे दाखल –
वाकोला उड्डाणपूलावर २३ डिसेंबर रोजी नायलॉन मांजाने (Nylon Manja Accident) मुंबई पोलीस दलातील पोलीस अंमलदार समीर जाधव यांचा बळी गेल्यानंतर मुंबई पोलिसांकडून बंदी असलेल्या नायलॉन मांजा विक्रेत्यांवर २५ डिसेंबर पासून कारवाईची मोहीम राबविण्यात आली होती. या मोहीम दरम्यान मुंबईसह उपनगरात २५ डिसेंबर ते १४ जानेवारी दरम्यान मांजा विक्रेत्यांवर ९२ गुन्हे दाखल करण्यात आले असून ५२ जणांवर अटकेची कारवाई करण्यात आली असल्यची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.
(हेही वाचा – Ram Mandir: अयोध्येहून आलेल्या अक्षता कलशाची मिरवणूक; ठिकठिकाणी मंगल वाद्य, रामनामाचा गजर, भव्य शोभायात्रेचे आयोजन)
नायलॉन मांजाचा मुंबईत दुसरा बळी –
सांताक्रूझ पाठोपाठ बोरिवलीत नायलॉन मांजाने (Nylone Manja) मुंबईत दुसरा बळी घेतला आहे. तर विलेपार्ले येथे एक जण मांजामुळे गंभीर जखमी झाल्याची घटना रविवार आणि सोमवारी समोर आली आहे. सोमवारी दुपारी काही कामानिमित्त बोरिवली येथे मोटार सायकलवर गेलेल्या धारावीच्या तरुणाच्या गळ्याला पतंगाचा मांजा अडकून त्याचा गळा चिरला (Nylon Manja Accident) असून त्यात त्याचा मृत्यू झाला आहे. दरम्यान विलेपार्ले पूर्व येथे एका सुरक्षा अधिकाऱ्याचा गळा मांजाने कापला गेला, त्यात हे अधिकारी गंभीर जखमी झाले असून त्यांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. (Nylon Manja Accident)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community