“कोणतीही आई स्वतःच्या मुलाला मारहाण करणार नाही” ; Bombay High Court चे निरीक्षण

60
"कोणतीही आई स्वतःच्या मुलाला मारहाण करणार नाही" ; Bombay High Court चे निरीक्षण

प्रियकराच्या साथीने आपल्याच ७ वर्षांच्या मुलाला मारहाण केल्याचा आरोप असलेल्या एका महिलेला उच्च न्यायालयाने (Bombay High Court ) नुकताच जामीन मंजूर केला. कोणतीही आई आपल्या मुलाला मारण्याचा विचार करू शकत नाही, असे निरीक्षणही न्यायालयाने या महिलेला दिलासा देताना नोंदवले. (Crime news)

हेही वाचा-Veer Savarkar : सावरकरांच्या वृक्षप्रेमाची साक्ष, नाशिकचा निंबोणी वृक्ष

तक्रारदार असलेले वडील आणि आरोपी असलेली आई यांच्यातील वैवाहिक वादात मुलाला त्रास होत आहे आणि त्याला बळीचा बकरा बनविण्यात आले आहे, असे निरीक्षण न्या. मिलिंद जाधव (Justice Milind Jadhav) यांच्या एकलपीठाने नोंदविले. मुलाच्या वैद्यकीय अहवालावरून असे दिसते की, मुलाला अपस्मार आणि फेफरे येते. तो कुपोषित आणि अशक्त आहे. मुलाची काळजी घेण्यासाठी आणि त्याला आधार देण्यासाठी आईने त्रास सहन केल्याचे कागदपत्रांवरून आढळते, असे न्यायालयाने नमूद केले. (Bombay High Court )

हेही वाचा-Veer Savarkar : स्वातंत्र्यवीर सावरकरांमुळेच टिकलं आहे हिंदूंचं अस्तित्व!

याचिकाकर्तीच्या प्रियकराने मुलावर लैंगिक अत्याचार केल्याचा दावाही तक्रारदाराने केला होता. तथापि, तक्रारदाराने केलेले आरोप हे सकृतदर्शनी अविश्वसनीय वाटतात, असे नमूद करून कोणतीही आई स्वतःच्या मुलाला मारहाण करण्याचा विचार करणार नाही, असे निरीक्षण एकलपीठाने नोंदवले. तसेच, याचिकाकर्तीला अटक करताना फौजदारी प्रक्रिया संहितेनुसार अनिवार्य असलेल्या तरतुदींचे पालन करण्यात पोलीस अपयशी ठरल्याचे मतही न्यायालयाने तिला जामीन मंजूर करताना नोंदवले. (Bombay High Court )

हेही वाचा-हिंदु संतांचा अवमान करणे, हीच काँग्रेसी संस्कृती; विजय वडेट्टीवार जाहीर माफी मागा; Hindu Janajagruti Samiti ची मागणी

अल्पवयीन मुलाच्या वैद्यकीय अहवालानुसार, तो मेंदूशी संबंधित आजाराने त्रस्त असून त्यामुळे तो अशक्त झाल्याचा निष्कर्ष नोंदवण्यात आला आहे. त्यामुळे, याचिकाकर्तीने मुलाची काळजी घेण्यासाठी आणि त्याला आधार देण्यासाठी खूप हाल-अपेष्टा सहन केल्याचे पुराव्यांतून स्पष्ट होत असल्याचेही न्यायालयाने आदेशात म्हटले. (Bombay High Court )

हेही वाचा-Assam मध्ये अदानी समूह करणार ५० कोटींची गुंतवणूक; विमानतळ, ऊर्जा क्षेत्राचा करणार विकास

दहिसर पोलिसांनी नोंदवलेल्या तक्रारीनुसार, २०१९ मध्ये याचिकाकर्तीने पतीपासून फारकत घेतली. त्यानंतर त्यांचा मुलगा रत्नागिरी येथे वडिलांसह राहत होता. तथापि, २०२३ मध्ये, याचिकाकर्ती जबरदस्तीने मुलाला मुंबईत घेऊन गेली. परंतु, मुलाला मुंबईत आणल्यावर तिने त्याला अनेकदा मारहाण केली आणि एकदा त्याला जीवे मारण्याचा प्रयत्नही केला. तक्रारदाराने या प्रकरणी तक्रार केल्यानंतर त्याआधारे याचिकाकर्तीला ऑक्टोबर २०२३ मध्ये अटक करण्यात आली होती आणि तेव्हापासून ती कोठडीत होती. (Bombay High Court )

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.