मुंबईत बॉम्बस्फोट होण्याची खोटी माहिती देणारा अटकेत

114

घोडबंदर गुजरातमार्गे मुंबईतील सीएसटीसह कुर्ला, दादर येथे बॉम्बलास्ट होणार असल्याची खोटी माहिती देणा-याला मंगळवारी, 6 डिसेंबर रोजी रात्री एमआयडीसी वाळूज पोलिसांनी अटक केली. पंजाब शिवानंद थोरवे असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

मोबाईलवरून इमर्जन्सीवर कॉल केला

मुंबईतील कुर्ला, सीएसटी, दादर येथे बॉम्बस्फोट होणार आहे. ते बॉम्बस्फोट घोडबंदर गुजरातमार्गे मुंबईत होणार, अशी माहिती पंजाब थोरवे याने 112 वर कॉल करून मुंबई कंट्रोल रूमला दिली. खळबळ उडवून देणा-या या फोननंतर मुंबई कंट्रोलरूमने लोकेशन ट्रेस करून एमआयडीसी वाळूज पोलिसांना दिली. या माहितीवरून एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याचे डायल 112 वरील कर्मचा-यांनी रांजणगाव शेणपूंजीतील दत्तनगर रोडवरील रऊफ चाचा बांगडीवाले यांच्या घरात किरायाने राहत असलेल्या डोळेपांघरा ता. लोणार जि. बुलढाणा येथील पंजाब शिवानंद थोरवे याची चौकशी केली. यावेळी पंजाब याने त्याच्या मोबाइलवरून इमर्जन्सीवर कॉल करून हिंदु-मुस्लिम धर्मात तेढ निर्माण होईल, असे वक्तव्य करून मुंबईतील सीएसटीसह कुर्ला, दादर येथे बॉम्बस्फोट होणार असल्याची खोटी माहिती दिल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी पोलीस शिपाई युसुफ इब्राहीम शेख यांनी दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक सचिन पागोटे हे करीत आहेत.

(हेही वाचा समान नागरी कायदा म्हणजे स्त्रियांना अनेक पती करण्याचा अधिकार, जावेद अख्तरांनी तोडले अकलेचे तारे)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.