आंतरराष्ट्रीय मानवी तस्करी प्रकरणी नाशिकमधून एकाला अटक, NIA ची कारवाई

191
आंतरराष्ट्रीय मानवी तस्करी प्रकरणी नाशिकमधून एकाला अटक, NIA ची कारवाई

आंतरराष्ट्रीय मानवी तस्करी आणि सायबर फसवणुकी प्रकरणी ‘एनआयए’ ने नाशिक जिल्ह्यातून सुदर्शन दराडेला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील ही सहावी अटक असल्याची माहिती एनआयएने दिली आहे. गेल्या महिन्यात स्थानिक पोलिसांच्या मदतीने एनआयएने विविध राज्यातून पाच जणांना अटक करण्यात आली होती. (NIA)

ही टोळी भारतातून गरजवंत आणि बेरोजगार तरुणांना परदेशात बड्या कंपनीत चांगल्या पगाराच्या नोकरीचे आमिष दाखवून या तरुणांना परदेशात पाठवले जात होते. तेथून परदेशात असलेल्या या टोळीचे सदस्य या तरुणांना लाओस आणि कंबोडिया सारख्या दक्षिण-पूर्व आशियाई देशांमध्ये सायबर गुन्हेगारी करण्यास भाग पाडले जात होते. ठाण्यातील एक तरुण यांच्या तावडीतून सुटून भारतात परत आल्यानंतर हा टोळीचे काळे कृत्य समोर आले होते. तावडीतून सुटलेल्या तरुणाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून या गुन्ह्याचा तपास सुरू करण्यात आला होता. या गुन्ह्याची आंतरराष्ट्रीय पातळीवर व्याप्ती असल्याकारणाने या गुन्ह्याचा तपास राष्ट्रीय तपास संस्था (NIA) कडून या गुन्ह्याचा तपास सुरू करण्यात आला आहे. (NIA)

या गुन्ह्यानंतर एनआयएने दोन जणांची या टोळीच्या तावडीतून सुटका करत त्यांना भारतात आणण्यात यश आले आहे. एनआयएने गुरुवारी नाशिक मधून अटक करण्यात आलेल्या सहाव्या आरोपी दराडे याच्याकडून मोठ्या प्रमाणात कागदपत्रे, डिजिटल उपकरणे, बँक खात्यांचे तपशील इत्यादींसह अनेक दोषी साहित्य जप्त करण्यात आले. दराडे आणि या टोळीने महाराष्ट्रातून एकूण किती तरुणांची तस्करी केली याची माहिती जप्त करण्यात आलेल्या कागदपत्रांवरून उघड होण्याची शक्यता आहे. (NIA)

(हेही वाचा – Kashid Beach Resort: तुम्ही फिरण्याचा प्लन करत आहात? मग काशिद बीच बद्दल अवश्य समजून जाणून घ्या)

अशाप्रकारे केली जायची तरुणांची फसवणूक 

एनआयए (NIA) कडून मानवी तस्करी आणि सायबर फसवणूक प्रकरणामागील कट उलगडण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. आंतरराष्ट्रीय सिंडिकेटच्या आदेशानुसार कार्यरत, तस्कर आणि सायबर घोटाळेबाज यांच्यात देशव्यापी संबंध असल्याचे प्राथमिक निष्कर्षांनुसार १३ मे रोजी एनआयएने मुंबई पोलिसांकडून प्रकरण ताब्यात घेतले होते. नाशिक येथून अटक करण्यात आलेला दराडे हा संघटित तस्करी सिंडिकेटमध्ये थेट सहभागी होता, भारतीय तरुणांना कायदेशीर नोकरी देण्याचे खोटे आश्वासन देऊन परदेशात पाठवत असल्याचे तपासात समोर आले आहे. तरुणांना लाओस, गोल्डन ट्रँगल एसईझेड आणि कंबोडिया येथे बनावट कॉल सेंटर्समध्ये काम करण्यास भाग पाडले जात होते. तसेच इतर ठिकाणी, विस्तृत सिंडिकेटद्वारे, प्रामुख्याने परदेशी नागरिक नियंत्रित आणि ऑपरेट करतात. हे सिंडिकेट भारताच्या विविध भागांमध्ये तसेच कंबोडिया, लाओस एसईझेड व्यतिरिक्त यूएई आणि व्हिएतनाम सारख्या इतर देशांतील टोळीच्या इतर सदस्यांशी जोडलेले होते. (NIA)

आतापर्यंत अटक करण्यात आलेले सर्व आरोपी हे थायलंड, कंबोडिया आणि व्हिएतनाममधील भारतीय तरुणांना लाओस एसईझेडमध्ये बेकायदेशीरपणे नेण्यासाठी आंतरराष्ट्रीय सीमेपलीकडून कार्यरत असलेल्या तस्करांच्या जवळच्या संगनमताने काम करत होते. तस्करी झालेल्या तरुणांना पुढे एनआयए च्या तपासांनुसार, क्रेडिट कार्ड फसवणूक, बनावट अर्ज वापरून क्रिप्टो चलनात गुंतवणूक, हनी ट्रॅपिंग इत्यादींसारख्या ऑनलाइन बेकायदेशीर काम करण्यास तरुणांना भाग पाडले जात आहे. भारतातील मोठ्या प्रमाणात हे बेरोजगार तरुण या टोळीचे सावज बनलेले असून या टोळीच्या तावडीतून सुटण्याची आणि भारतात परतण्याची वाट पहात असल्याची माहिती या टोळीच्या तावडीतून सुटून भारतात आलेल्या तरुणांनी पोलिसांना माहिती दिली आहे. (NIA)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.