- प्रतिनिधी
ठाण्यातील पोलीस परेड मैदानाजवळ गावठी बॉम्बसह एकाला अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या व्यक्तीकडून १० गावठी बॉम्ब जप्त करण्यात आले असून राबोडी पोलीस ठाण्यात या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे गावठी बॉम्ब त्याने विकण्यासाठी ठाण्यात आणले होते अशी माहिती तपासात समोर आली आहे. (Thane News)
(हेही वाचा – Bihar Assembly Election 2025 : बिहार निवडणुकीचा प्रचारही महिला केंद्रित होणार)
सुभाष पहेलकर असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव असून रायगड जिल्ह्यातील माणगाव येथे राहणारा आहे. ठाण्यातील साकेत रोड येथील पोलीस परेड मैदान येथे एक व्यक्ती स्फोटके विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती ठाण्यातील गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार रोहन म्हात्रे यांना मिळाली होती. गुन्हे शाखेच्या अधिकारी आणि अंमलदारांनी सोमवारी दुपारी श्वान पथकासह पोलीस परेड मैदान येथे सापळा रचून संशयास्पद हालचालीवरून एकाला ताब्यात घेऊन त्याच्याकडे असलेल्या बॅग तपासणी पूर्वी श्वान पथकातील ब्रुनो या श्वानाने बॅगेत स्फोटके असल्याचा इशारा दिल्यानंतर पोलिसांनी बॅग तपासली असता त्यात १० गावठी बॉम्ब सापडले. (Thane News)
(हेही वाचा – Parliament Winter Session : …तर रविवारी पण संसद सुरु राहील; ओम बिर्लांनी विरोधकांना दिली तंबी)
ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तीकडे चौकशी करण्यात आली असता त्याने त्याचे नाव सुभाष पहेलकर असे सांगून तो रायगड जिल्ह्यात राहणार आहे. रानडुकरांना ठार करण्यासाठी हे गावठी बॉम्ब तयार करण्यात आले होते. हे गावठी बॉम्ब विक्रीसाठी ठाण्यात घेऊन आला होता अशी माहिती त्याने पोलिसांना दिली. हे बॉम्ब ठाण्यात कुणाला विकणार होता याचा तपास सुरु असून गुन्हे शाखेने राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरु आहे. (Thane News)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community