-
प्रतिनिधी
मुंबई विमानतळ कस्टम्सच्या एअर इंटेलिजेंस युनिट (एआययू) ने बँकॉकमधून ३ कोटी रुपयांच्या ड्रग्जची तस्करी केल्याप्रकरणी २५ वर्षीय अकाउंटंट आणि पार्ट टाईम रिअल इस्टेट ब्रोकर म्हणून काम करणाऱ्याला अटक केली आहे. अटक आरोपीने बँकांक येथून आणलेला गांजा बंगळुरू येथे विक्रीसाठी घेऊन जाणार होता तत्पूर्वीच त्याला अटक करण्यात आली आहे. (Mumbai Airport)
(हेही वाचा – Chhattisgarh च्या चकमकीत महिला नक्षलवादी ठार)
२९ मार्च रोजी बँकॉकहून मुंबई विमानतळावर पोहोचलेल्या केरळमधील कासरगोड येथील रहिवासी मोहम्मद शरीफ याला अमली पदार्थ घेऊन जाणाऱ्या प्रवाशाबद्दलच्या विशिष्ट गुप्त माहितीच्या आधारे, कस्टम अधिकाऱ्यांनी त्याला अटक केली. त्याच्या ट्रॉली बॅगची तपासणी केली असता त्यात सहा पारदर्शक प्लास्टिक पॅकेट्स आढळून आले. ज्यात हिरवा, कोरडा, पानांचा गोळा होता, जो त्याने हायड्रोपोनिक विड (गांजा) म्हणून ओळखला. अधिकाऱ्यांनी ३.००४ किलो गांजा जप्त केला ज्याची आंतरराष्ट्रीय किंमत अंदाजे ३ कोटी रुपये आहे. शरीफने कबूल केले की २७ मार्च रोजी तो बंगळुरूमधील जब्बीर मिन्नूला विक्रीसाठी गांजा खरेदी करण्यासाठी बँकॉकला गेला होता. (Mumbai Airport)
(हेही वाचा – गोंधळलेले Raj Thackeray; महापालिका निवडणुकीआधी मनसेची दिशाहीनता कायम)
“शरीफने दावा केला की त्याने बँकाकला प्रवासापूर्वी १.२० लाख रुपयांचे कर्ज घेतले आणि ५,३०० सौदी रियाल आणि ७५० अमेरिकन डॉलर्सची देवाणघेवाण केली. हायड्रोपोनिक गांजा खरेदी करण्यासाठी ६०,००० खर्च केले. त्याने पुढे कबूल केले की नफ्यासाठी ड्रग्जची तस्करी करण्याची ही त्याची पहिलीच वेळ होती. तपास सुरुवातीच्या टप्प्यात आहे आणि त्याच्या प्रमुख साथीदारांना ओळखण्यासाठी आणि अटक करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत,” असे एका कस्टम अधिकाऱ्याने सांगितले. (Mumbai Airport)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community