Pune NIA : एनआयएकडून पुण्यात आणखी एका दहशतवाद्याला अटक

पुणे पोलीस आणि राज्य दहशतवादी विरोधी पथकाने (एटीएस) दहशतवाद्यांना अटक करून ‘इस्लामिक स्टेट’चे (आयएस) महाराष्ट्र मॉड्यूल उद्ध्वस्त केले.

141
Pune NIA : एनआयएकडून पुण्यात आणखी एका दहशतवाद्याला अटक
Pune NIA : एनआयएकडून पुण्यात आणखी एका दहशतवाद्याला अटक

पुण्यात एनआयएकडून आणखी एका दहशतवाद्याला अटक करण्यात आली आहे. ‘इस्लामिक स्टेट’चे (ISIS) महाराष्ट्र मॉड्यूल उद्ध्वस्त केले. महंमद शाहनवाज आलम (वय ३१, मूळ झारखंड), असे अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्याचे नाव आहे पुणे ISIS मॉड्युल प्रकरणात सध्या अटक करण्यात आलेल्या इतर आरोपींशी शाहनवाज आलमचा थेट संबंध होता.शस्त्र चालवणं आणि स्फोटकांचे सराव वर्ग घेत असल्याचं समोर आहे. पुणे ISIS मॉड्युल प्रकरणात ही आठवी अटक आहे. दहशतवाद्यांना अटक करून ‘इस्लामिक स्टेट’चे (आयएस) महाराष्ट्र मॉड्यूल उद्ध्वस्त करण्यात यश मिळाले आहे. (Pune NIA)

लपण्याचे ठिकाण शोधणे, शस्त्र चालवण्याचे आणि स्फोटकांचे सराव वर्ग आयोजित करण्यात आलमचा सहभाग होता. जुलै महिन्यात कोथरूड येथे दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली तेव्हा आलम पसार झाला होता. पुणे पोलीस आणि राज्य दहशतवादी विरोधी पथकाने (एटीएस) दहशतवाद्यांना अटक करून ‘इस्लामिक स्टेट’चे (आयएस) महाराष्ट्र मॉड्यूल उद्ध्वस्त केले. साकी आणि खान यांनी पुणे आणि सातारा येथील जंगलात बॉम्बस्फोट केले होते. या दोघांना राहण्यास खोली देणारा अब्दुल कादिर दस्तगीर पठाण आणि आर्थिक मदत करणारा मेकॅनिकल अभियंता सिमाब नसरूद्दीन काझी यांना ‘एटीएस’ने अटक केली.
ISIS मॉड्युलप्रकरणी NIA ने केलेल्या तपासात समोर आले आहे की, आरोपी व्यक्तींनी ISIS अजेंडा पुढे नेण्यासाठी देशातील शांतता आणि जातीय सलोखा बिघडविण्याच्या उद्देशाने दहशतवादी कृत्ये करण्याची योजना आखली होती. दहशतवाद्यांनी पुण्यासह काही शहरांमध्ये घातपाताचा कट आखला होता.

(हेही वाचा : Gold smuggling In Mumbai: डीआरआयची तीन ठिकाणी कारवाई ,१३.७ किलो सोनं जप्त)

ISIS, ज्याला इस्लामिक स्टेट (IS), इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड द लेव्हंट (ISIL), इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया (ISIS), Daish, इस्लामिक स्टेट इन खोरासान प्रांत (ISKP), ISIS विलायत खोरासान, आणि इस्लामिक स्टेट म्हणूनही ओळखले जाते. इराक आणि शाम खोरासान (ISIS-K), सक्रियपणे भारतविरोधी अजेंडा राबवत आहे आणि हिंसक कृत्यांच्या मालिकेद्वारे देशभरात दहशत आणि हिंसाचार पसरवत आहे.

पाकिस्तान दहशतवाद्यांना आश्रय देतंय
शाहनवाजवर ISIS मॉड्यूलशी संबंध असल्याचा आरोप आहे. चौकशीदरम्यान त्याने गुजरातमधील अक्षरधाम मंदिरावरील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार फरतुल्ला गौरी आणि त्याचा जावई शाहिद फैसल यांच्या संपर्कात असल्याचं सांगितले. तो पाकिस्तानमध्ये आयएसआयच्या आश्रयाने राहत असल्याचं उघड झालं आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.