Mumbai Crime : माझगाव येथील गोळीबार गुटखा व्यवसायातून, एकाला अटक

शनिवारी झालेल्या या गोळीबारात एक जण किरकोळ जखमी झाला होता.

124
Mumbai Crime : माझगाव येथील गोळीबार गुटखा व्यवसायातून, एकाला अटक
Mumbai Crime : माझगाव येथील गोळीबार गुटखा व्यवसायातून, एकाला अटक

भायखळ्यातील माझगाव येथे झालेल्या गोळीबार प्रकरणात पोलिसांकडून एकाला अटक करण्यात आली आहे. शनिवारी झालेल्या या गोळीबारात एक जण किरकोळ जखमी झाला होता. हा हल्ला गुटख्याच्या बेकायदेशीर आर्थिक व्यवहारातून झाला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. (Mumbai Crime)

औरंगजेब उर्फ ​​शेरू खान (३३) असे अटक करण्यात आलेल्या दोन हल्लेखोरांपैकी एकाचे नाव असून दुसऱ्याचा कसून शोध घेण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. अटक आरोपी एक्टिव्हा चालवत होता तर फरार असलेला इम्रान उर्फ ​​बाबू शेख (३३) या हल्लेखोराने गोळीबार केला होता. (Mumbai Crime)

शनिवारी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास भायखळा येथील माझगाव सर्कल या ठिकाणी असलेल्या अफजल बिर्याणी या हॉटेलजवळ उभ्या असलेल्या कथित गुटखा व्यापाऱ्यावर एक्टिव्हा वरून आलेल्या दोन जणांनी गोळीबार करून पळ काढला होता. या गोळीबारात मौसीन सलमानी (३३) हा किरकोळ जखमी झाला होता. मौसीन सलमानी आणि इतर तिघे व्यापारी अफजल बिर्याणी या ठिकाणी पहाटेच्या सुमारास उभे असतांना हा हल्ला झाला होता. या प्रकरणी भायखळा पोलिसांनी हत्येचा प्रयत्न आणि आर्म्स ऍक्ट नुसार गुन्हा दाखल केला होता. (Mumbai Crime)

(हेही वाचा – Gutkha Seized : मुंबई, नवी मुंबईमधून लाखोंचा गुटखा, पान मसाला जप्त)

पोलिसांच्या तपासात हल्लेखोर आणि त्या ठिकाणी उभे असलेले कथित गुटखा व्यापाऱ्यात गुंतले आहे. गुटख्याच्या बेकायदेशीर धंद्यातून अंतर्गत वाद सुरू आहे. या वादातून हा हल्ला झाला असल्याचे बोलले जात आहे. भायखळा पोलिसांनी हल्लेखोरांची ओळख पटविल्यानंतर त्याचा शोध सुरू केला असता हल्लेखोरापैकी औरंगजेब उर्फ ​​शेरू खान (३३) हा पोलिसांच्या हाती लागला असून त्याचा दुसरा सहकारी इम्रान उर्फ ​​बाबू शेख याचा कसून शोध घेण्यात येत असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे. (Mumbai Crime)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.