Online Fraud : डॉक्टरला ३०० रुपयांची लिपस्टिक पडली लाखात

ऑनलाईन ऑर्डर करणे या डॉक्टरला चांगलेच महागात पडले आहे.

181
Online Froud : फेडेक्स कुरिअरच्या नावाखाली ऑनलाईन फसवणूक, राजस्थानमधून एकाला अटक

सायबर हँकिंगसाठी चोर विविध मार्ग अवलंबत आहेत.सध्या सायबर क्राईमच्या (Cyber Crime) अनेक घटना घडत आहेत. असाच एक धक्कादायक  प्रकार समोर आला आहे. मात्र या सायबर क्राईमच्या विळख्यात चक्क एक महिला डॉक्टर अडकली आहे. तर या डॉक्टरने ३०० रूपयाची लिपस्टिक ऑनलाईन ऑर्डर केली होती. मात्र हीच लिपस्टिक लाखात पडली आहे. त्यामुळे ऑनलाईन ऑर्डर करणे या डॉक्टरला चांगलेच महागात पडले आहे. (Online Fraud )

नेमके काय घडले 

मिळालेल्या माहितीनुसार, लिपस्टिक ऑर्डर केल्यानंतर काही दिवसांनी महिला डॉक्टरला ऑर्डरची डिलिव्हरी झाली असल्याचा मेसेज आला. मात्र प्रत्यक्षात वस्तूच न मिळाल्याने त्यांनी कंपनीच्या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधला. तिथून त्यांना प्रोसेस न झाल्याचे सांगण्यात आले. त्यांनतर तुम्हाला २ रुपये पाठवावे लागतील असे सांगितले मात्र महिलेने पैसे पाठवण्यास नकार दिला. त्यानंतर या डॉक्टराला एक वेब लिंक पाठवण्यात आली. तिला ही लिंक डाउनलोड करण्यास सांगितले. यानंतर त्यांना त्यांचा पत्ता आणि बँक तपशील भरण्यास सांगण्यात आले.त्यांना भीम युपीआय लिंक तयार करण्याचा मेसेजही आला. तर ऑर्डर केलेली वस्तू पोहचेल असे कंपनीकडून आश्वस्त करण्यात आले. (Online Fraud )

(हेही वाचा : Mumbai-Pune Express Way वर २१ नोव्हेंबरला ब्लॉक)

९ नोव्हेंबर रोजी महिला डॉक्टरच्या खात्यातून पहिल्यांदा ९५ हजार आणि नंतर ५ हजार रुपये कापण्यात आले. पैसे कापून घेतल्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.ऑनलाइन शॉपिंग ही आता जवळपास प्रत्येक घराची गरज बनली आहे. त्यामुळे, तुम्ही सुरक्षित ऑनलाइन पेमेंट करणे महत्त्वाचे आहे जेणेकरून फसवणूक टाळता येईल. यासाठी केवळ नामांकित वेबसाइटवरूनच खरेदी करणे महत्त्वाचे असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.