Jammu and Kashmir मध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांना शस्त्रांसह अटक

236
Jammu and Kashmir मध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांना शस्त्रांसह अटक
Jammu and Kashmir मध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांना शस्त्रांसह अटक
काश्मीरच्या कुलगाम (Kashmir Kulgam) जिल्ह्यात, लष्कराच्या 1 पॅरा आणि 9 आरआर युनिट्ससह पोलिसांनी TRF/लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेच्या दोन OGW (Over ground workers) ला अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एका आरोपीचे नाव अल्ताफ अहमद लोन मुलगा अब्दुल अहद लोन, रहिवासी कचुरा जदूरा असे आहे, तर दुसरा आरोपी मंजूर अहमद भट मुलगा अब्दुल रशीद भट, रहिवासी निपोरा, मीर बाजार आहे. (Jammu and Kashmir)
गुलाबबाग, काझीगुंड (Gulab Bagh, Qazigund) येथे पकडलेल्या या आरोपींच्या चौकशीत त्यांच्याजवळ शस्त्रे आणि दारूगोळा लपवून ठेवल्याचे उघड झाले. त्याच्या खुलाशानंतर, पोलिसांनी दोन एके-56 रायफल (AK-56 rifle), चार एके मालिका मॅगझिन आणि 79 जिवंत काडतुसे जप्त केली.
पाकिस्तानी हँडलरच्या सूचनेनुसार काम 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे दोन्ही OGW पाकिस्तानी हँडलर ‘हमजा भाई’च्या सूचनेनुसार दहशतवादी कारवाया घडवण्याची योजना आखत होते. या परिसरात दहशतवादी कारवाया करण्याचा त्यांचा डाव होता, असेही समोर आले आहे. पोलिसांनी या अटकांना परिसरातील दहशतवादाविरुद्ध मोठे यश असल्याचे म्हटले आहे.

(हेही वाचा – अयोध्या, संभल, बांगलादेश…सर्वांचा डीएनए एकच; CM Yogi Adityanath यांचे महत्वपूर्ण विधान )

सुरक्षा दलाच्या सतर्कतेमुळे कट उधळला
पोलीस आणि सुरक्षा दलाच्या या कारवाईमुळे परिसरात मोठी दहशतवादी घटना टळली आहे. दहशतवादी आणि त्यांच्या साथीदारांविरुद्ध कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचे कुलगाम पोलिसांनी म्हटले आहे. त्याच वेळी, सुरक्षा दलांनी लोकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे आणि कोणत्याही संशयास्पद हालचालींची त्वरित तक्रार करा.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.