Drugs : रतलाममधील कोट्यवधींचा अफू मुंबईत जप्त, ४ जणांना अटक

193
Drugs : रतलाममधील कोट्यवधींचा अफू मुंबईत जप्त, ४ जणांना अटक
  • प्रतिनिधी 

मध्य प्रदेशातील रतलाम येथून अंमली पदार्थांचा (Drugs) साठा घेऊन मुंबईकडे निघालेला ट्रक मुंबईच्या वेशीवर पकडण्यात आला आहे. ही कारवाई महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) मुंबई विभागाने केली आहे. या कारवाईत डीआरआयने कोट्यवधी रुपये किमतीचा अफू हा अंमली पदार्थ जप्त केला आहे.

(हेही वाचा – Sion Koliwada मध्ये विद्यमान आमदारांनी गरब्यात नाचवले गौतमी, शिल्पाला; तर इच्छुक उमेदवार नवदुर्गांच्या सन्मानात)

मध्य प्रदेशातील रतलाम येथून एका ट्रकमधून मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थांची (Drugs) तस्करी करण्यात येत असून, हा ट्रक मुंबईच्या दिशेने येत असल्याची माहिती महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) मुंबई विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. डीआयआर अधिकाऱ्यांनी राज्यातील टोल नाक्यांवर सापळा रचून कसारा येथील टोल नाक्यावर एका संशयित ट्रकला ताब्यात घेऊन ट्रकची झडती घेतली असता ट्रकमध्ये ९ किलो ६९० ग्राम अफू हा अंमली पदार्थ सापडला. डीआरआयने जप्त केलेला अफूची कोट्यवधी रुपये किंमत असल्याची माहिती डीआयआर अधिकाऱ्यांना दिली.

(हेही वाचा – Dasara Melava 2024 : दसरा मेळाव्यातून दोन्ही Shiv Sena पक्षांचे शक्तीप्रदर्शन !)

या प्रकरणी डीआयआरने ट्रक चालकासह दोन जणांना ताब्यात घेऊन त्याच्या विरुद्ध अंमली पदार्थ (Drugs) प्रतिबंधक कायदा अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान डीआयआरने केलेल्या अधिक चौकशी रतलाम येथून अफू हा अंमली पदार्थ मुंबईकडे पाठवणारा तसेच मुंबईत अफूची डिलिव्हरी घेण्यासाठी आलेल्या दोघांनाही अटक करण्यात आली आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.