मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने कोरोना महामारीच्या काळात झालेल्या ऑक्सिजन पुरवठा घोटाळ्याप्रकरणी नागपाडा पोलीस ठाण्यात बुधवारी रात्री उशिरा गुन्हा नोंदवला आहे. कोरोना काळात ऑक्सिजन पुरवठयात झालेल्या घोटाळ्याचा तपास मुंबई आर्थिक गुन्हे शाखेकडून करण्यात येत होता. (Oxygen Scam)
या घोटाळ्याच्या तपासात आर्थिक गुन्हे शाखेच्या हाती काही पुरावे मिळून आल्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेने बुधवारी रात्री नागपाडा पोलीस ठाण्यात यासंबधी कागदपत्रे सादर करून कंत्राटदार रोमीन छेडा यांच्यासह मनपा अधिकारी आणि काही खासगी व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Oxygen Scam)
(हेही वाचा – Israel Hamas War : 10 नवीन ओलिसांना सोडल्यास एक दिवसाचा युद्धविराम)
आर्थिक गुन्हे शाखेने दिलेल्या तक्रारीनुसार मुंबईतील रुग्णालयात ऑक्सिजन तयार करण्याचे प्लांट आणि जंबो कोविड सेंटर बांधण्याचे कंत्राट छेडा यांना देण्यात आले होते. छेडा यांनी ठराविक मुदतीत बांधकाम पूर्ण करायचे होते. तथापि, त्यांनी कथितपणे तयार करण्यात आलेल्या कागदपत्रात ऑगस्ट २०२१ मध्ये प्लांटचे काम पूर्ण झाल्याचा खोटा दावा केला आहे. (Oxygen Scam)
त्यानंतर, कथित विलंबासाठी विलंब शुल्क आकारले गेले त्यामुळे मनपाचे ६ कोटी रुपयांपेक्षा जास्त आर्थिक नुकसान झाले असे दाखल करण्यात आलेल्या एफआयआरमध्ये म्हटले आहे. रोमीन छेडा राजकीयदृष्ट्या प्रभावशाली कंत्राटदार असून मुंबई महानगरपालिकेची अनेक कंत्राटे त्यांच्याकडे होती, त्यांच्या कंपनी भायखळा येथील जिजामाता उद्यान प्राणी संग्रहालयाच्या नूतनीकरणाच्या कामात गुंतलेली आहे. (Oxygen Scam)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community