Terrorist In Mumbai : मुंबईची गाझा पट्टी बनत आहे ठाणे जिल्ह्यातील ‘पडघा’

259

मुंबई जवळील ठाणे जिल्ह्यातील ‘पडघा’ हे गाझा पट्टीच्या धर्तीवर समोर येत आहे. (Terrorist In Mumbai) २००३ पासून पडघा हे दहशतवाद्यांचे आश्रयस्थान बनलेले आहे. देशभरातून दहशतवादी कारवाया करण्यासाठी महाराष्ट्रात येणाऱ्या दहशतवाद्यांसाठी पडघा हे मुक्तक्षेत्र असल्याचे समजले जाते.

शरियाचे पालन

पडघ्यात शरिया कायद्याचे पालन केले जात असल्याचे एनआयए (नॅशनल इन्व्हेटिगेशन एजन्सी, NIA)ने नुकत्याच केलेल्या कारवाईत समोर आले आहे. इसिसच्या पुणे आयएसआय मॉड्युल प्रकरणात फरार असलेला अब्दुला शेख हा पॅलेस्टाईन, सीरिया आणि इसिसच्या विचारसरणीशी संबंधित लेख त्यांच्या व्हाट्सएप ग्रुप वर पोस्ट करत होता. या ग्रुपमध्ये अनेक कट्टरपंथी तरुणांना सामील करण्यात आले होते.

(हेही वाचा – Kerala : गेल्या काही दशकांत केरळमधील हिंसाचारात वाढ)

मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी साकीब नाचन याच्या अटकेमुळे पहिल्यांदाच पडघा हे गाव भारताच्या नकाशावर समोर आले. त्यानंतर आता पुन्हा राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) इसिसच्या पुणे आयएसआय मॉड्युल प्रकरणी पडघा येथून अटक करण्यात आलेल्या साकीब नाचन याचा मुलगा शमील नाचन, नातलग अकिब नाचन आणि झुल्फिकार बडोदावाला यांच्या अटकेनंतर पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. (Terrorist In Mumbai)

हमास या पॅलेस्टिनी दहशतवादी संघटनेच्या ताब्यात असलेली गाझा पट्टी क्षेत्रफळाच्या दृष्टीने मुंबईपेक्षाही लहान आहे. गाझा पट्टी हा परिसर इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यामधील भाग आहे, या ठिकाणी पॅलेस्टिनी रहातात. गाझा पट्टीची लोकसंख्या खूप कमी आहे. गाझा पट्टी हे दहशतवादी कारवायासाठी कुप्रसिद्ध असल्याचे संपूर्ण जगाला माहीत आहे. गाझा पट्टीच्या धर्तीवर महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील पडघा गाव दहशतवाद्यांचे आश्रयस्थान बनत आहे.

कोरोना काळातही मशिदी खुल्या

पुणे आयएसआय इसिस मॉड्युल प्रकरणात एनआयएने दाखल केलेल्या आरोपपत्रातून धक्कादायक माहिती समोर येत आहे. भिवंडी तालुक्यातील पडघा गावाला दहशतवाद्यांनी सीरियाची उपमा दिली आहे. पडघा हे गाव कट्टरपंथियासाठी एक मुक्त क्षेत्र आहे. तेथे शरियाचे पालन केले जाते, कोरोना महामारीच्या काळातही येथील मशिदी खुल्या होत्या. हे  गाव अल-शाम (ग्रेटर सीरिया प्रदेश) सारखे होते, असे एका साक्षीदाराने एनआयएच्या जबाबात म्हटले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. (Terrorist In Mumbai)

(हेही वाचा – Hamas Support Rally in Kerala : केरळचा होतोय काश्मीर…)

इसिसच्या पुणे मॉड्युल प्रकरणातील फरार दहशतवादी अब्दुला शेख हा पॅलेस्टाईन, सीरिया आणि इसिसच्या विचारसरणीशी संबंधित लेख पोस्ट करीत होता, असा दावा साक्षीदाराने केला आहे. त्याने दावा केला की, झुबेर व्यतिरिक्त एक तल्हा खान, अब्दुल्ला शेख (वॉन्टेड आरोपी जो ओमानमध्ये असल्याचे सांगितले जाते), बडोदावाला, अब्दुल कादीर, सिमाब काझी हे त्या व्हॉट्सॲप ग्रुपचे सदस्य होते, ज्यांनी इसिसला पाठिंबा दिला आणि दहशतवादी गटाच्या विचार सरणीचा प्रचार केला. (Terrorist In Mumbai)

२००३ पासून दहशतवादी कारवाया 

भिवंडी तालुक्यातील पडघा गाव प्रथमच जगासमोर आले, ते २००३ मध्ये मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटाच्या वेळी, साकीब नाचन या दहशतवाद्याला मुंबई गुन्हे शाखेने मुलुंड येथे झालेल्या बॉम्बस्फोटाच्या प्रकरणी अटक केली होती.

साकीब नाचन हा बंदी घालण्यात आलेल्या ‘स्टुडंट्स इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया’ या भारतातील एक दहशतवादी संघटनेचा पदाधिकारी होता. त्याने मुलुंड बॉम्बस्फोटासाठी पडघ्यातील जंगलात दहशतवाद्यांसाठी प्रशिक्षण केंद्र आणि कॅम्प तयार केले होते अशी माहिती एका अधिकारी यांनी दिली. साकीब नाचन हा शिक्षा भोगून १० वर्षांनी तुरुंगातून बाहेर आल्यानंतर तो पुन्हा पडघ्यात वास्तव्य करू लागला. (Terrorist In Mumbai)

(हेही वाचा – Kerala : भीतीच्या सावटाखाली आहे केरळमधील हिंदू जनजीवन)

राज्य एटीएस आणि एनआयएने नुकत्याच केलेल्या कारवाईत आयएसआयचे पुणे मॉड्युल उध्वस्त करून या प्रकरणात पुणे कोंढवा, मुंबई आणि पडघा येथून झुल्फिकार अली बडोदावाला, सिमाब नसिरुद्दीन काझी, अब्दुल कादिर पठाण, शमिल साकिब नाचन, मोहम्मद इम्रान खान आणि मोहम्मद युनूस साकी आणि डॉ अदनान अली सरकार यांना अटक केली आहे.

अटक करण्यात आलेल्यांपैकी झुल्फिकार, शमील साकीब नाचन आणि अकिब नाचन यांना पडघ्यातून अटक करण्यात आली. शमील नाचन हा साकीब नाचनचा मुलगा असून अकिल हा जवळचा नातलग असल्याचे समोर आले. अटक करण्यात आलेले सर्व इसिस संघटनेशी संबंधित आहे. (Terrorist In Mumbai)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.