Sambhal Riots चे पाकिस्तान कनेक्शन; शाही जामा मशिदीजवळ सापडले ‘मेड इन पाक’च्या गोळ्या अन् काडतूस

762
उत्तर प्रदेशातील संभल (Sambhal violence) येथील जामा मशिदीच्या (Jama Masjid, Sambhal Uttar Pradesh) सर्वेक्षणादरम्यान पाकिस्तान आणि दहशतवाद्यांचे कनेक्शन समोर आले आहे. जामा मशिदीजवळील नाल्यात काही जिवंत काडतुसे आणि खोके सापडले. हे सर्व पाकिस्तानच्या ऑर्डिनेंस फैक्ट्रीमध्ये बनवण्यात आले आहेत. संभलचे एसपी केके बिश्नोई यांनी ही काडतुसे सापडल्याची माहिती दिली आहे. संभल कोर्टात जामा मशिदीच्या सर्वेक्षणाचा अर्ज दाखल झाल्यानंतर पाकिस्तानमध्ये हिंसाचाराचा कट रचल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. (Sambhal Riots)
फॉरेन्सिक टीमला काय काय सापडलं? 

संभल हिंसाचाराच्या (sambhal violence) तपासासाठी फॉरेन्सिक टीम घटनास्थळी पोहोचली होती. दरम्यान, नाल्यांची तपासणी केली असता, पथकाला पाकिस्तानी शस्त्रास्त्र कारखान्यात तयार झालेले शेल्स (काडतूस कवच) आढळून आले. फॉरेन्सिक टीम सोबतच गुप्तचर पोलिस म्हणजेच SIU युनिटही घटनास्थळी पोहोचले होते. दरम्यान, अधिकाऱ्यांच्या पथकाला घटनास्थळावरून पाकिस्तान ऑर्डिनन्स फॅक्टरीमधील २ मिसफायर आणि ९ एमएमचे १ शेल मिळाले आहेत. याशिवाय १२ बोअरचे दोन आणि ३२ बोअरचे दोन शेल्सदेखील मिळाले आहेत.


पाकिस्तानने बनवलेली काडतुसे नाल्यात सापडली
खरं तर, पाकिस्तानात बसलेले दहशतवादी यापूर्वीही अशाच पद्धतीने काश्मीरमध्ये दगडफेक करत असत. आता संभल हिंसाचाराच्या तपासादरम्यान जामा मशिदीच्या आजूबाजूच्या नाल्यांची सफाई केली असता ही काडतुसे सापडली आहेत. संभल पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येथे सापडलेल्या सर्व गोळ्या पाकिस्तानच्या ऑर्डिनन्स फॅक्टरीत (Ordnance Factory of Pakistan) बनवल्या गेल्या आहेत. या सर्व गोळ्या दंगलीच्या वेळी वापरण्यात आल्या होत्या. काही गैरप्रकार झाले. कोर्ट कमिशनची टीम सर्व्हेसाठी २४ नोव्हेंबरला संभलच्या शाही जामा मशिदीत पोहोचली होती.

(हेही वाचा – Newly Elected MLA केव्हा शपथ घेणार? विधानसभा अध्यक्ष निवड कधी?)

बाहेरील व्यक्ती आणि राजकीय लोकांना प्रवेश बंदी 
संभलमधील हिंसाचारावरून जोरदार राजकारण सुरू आहे. सध्या संभल हे संपूर्ण उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) राजकारणाचे केंद्र बनले आहे. सुमारे १० दिवसांपूर्वी संभलमध्ये झालेल्या हिंसाचारावरून दिवसेंदिवस राजकारण वाढताना दिसत आहे. जिल्हा प्रशासनाने संभलमध्ये कलम १६३ लागू केले आहे. या परिसरात बाहेरील व्यक्ती आणि राजकीय लोकांना प्रवेश बंदी आहे.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.