जुगार खेळणे हा गुन्हा आहे. (Parbhani Police) ठिकठिकाणच्या जुगार अड्ड्यांवर पोलीस धडक कारवाई करत असतात अशातच परभणीमध्ये चक्क जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात बसून पोलीसच जुगार खेळत असल्याचे उघड झाले आहे. पोलिसांकडून पोलीस अधीक्षक कार्यालयात हा गुन्हा घडल्याने खळबळ माजली आहे. (Parbhani Police)
(हेही वाचा – Ind vs Eng : लखनौच्या उकाड्यात तळाच्या भारतीय फलंदाजांनी केला फलंदाजीचा सराव)
पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या परिसरातच असलेल्या रेस्ट रूममध्ये हा जुगार सुरू होता. जिल्हा पोलीस दलातील पाच पोलीस कर्मचारी तसेच, लाच लुचपत विभागाचा एक कर्मचारी आणि महामार्ग पोलिसात कार्यरत असलेला एक कर्मचारी असे सात जण मिळून जुगार खेळत होते. पोलीस अधीक्षक कार्यालयातीलच एका खोलीत जुगाराचा डाव रंगल्याची माहिती मिळताच स्वतः जिल्हा पोलीस अधीक्षक रागसुधा आर तिथे दाखल झाल्या आणि त्यांनी कारवाई केली. मोंढा पोलीस ठाण्यात 7 पोलीस कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील ५ पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. या ठिकाणाहून 5 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. (Parbhani Police)
रागसुधा आर या कठोर शिस्तीसाठी प्रसिद्ध असलेल्या आहेत. जुगार खेळणाऱ्या सातही जणांना त्यांनी मोंढा पोलिसांच्या स्वाधीन केले आणि गुन्हा दाखल करण्याचे आदेशही दिले. 12 अ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्व कर्मचाऱ्यांची कसून चौकशी करण्यात येईल आणि चौकशीअंती या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांविरोधात शिस्तभंगाची, पोलिसांची प्रतिमा मलीन केल्याप्रकरणी कठोर कारवाई करण्यात येणार आहे. (Parbhani Police)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community