विक्रोळीत २३ व्या मजल्यावरून पार्किंग लिफ्ट कोसळली, एका कामगाराचा मृत्यू

मुंबईतील विक्रोळीमध्ये लिफ्ट दुर्घटना घडली आहे. श्री सिद्धिविनायक सोसायटीच्या पार्किंगची लिफ्ट २३ व्या मजल्यावरून कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत एकजण ठार झाला असून ३ कामगार जखमी झाले आहेत.

( हेही वाचा : अनिल परबांच्या अडचणीत वाढ! ईडीकडून १० कोटी २० लाखांची संपत्ती जप्त )

दुर्घटनेत एका कामगाराचा मृत्यू

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, विक्रोळीच्या श्री सिद्धिविनायक को-ऑपरेटिव हाऊसिंग सोसायटीच्या पार्किंग लिफ्टच्या कामावेळी ही लिफ्ट कोसळली. या अपघातात शिवम जयस्वाल या वीस वर्षीय कामगाराचा मृत्यू झाला. ज्यावेळी ही दुर्घटना घडली त्यावेळी या लिफ्ट मध्ये चार कामगार होते. ज्यामधील तिघांना सुखरूप बाहेर काढण्यात आले परंतु शिवम जयस्वाल याचा या दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू झाला, अग्निशमन दलाच्या जवानांनी दीड तासानंतर त्याचा मृतदेह बाहेर काढला. या ठिकाणी हायड्रोलिक पार्किंगचे काम सुरू असताना या इमारतीमध्ये तीनशे कुटुंब वास्तव्यास होती. दुपारच्या सुमारास अचानक जेव्हा या हायड्रोलिक लिफ्ट कोसळली तेव्हा या इमारतीला हादरे बसले. सोबतच काही भागाची पडझड देखील झाली त्यामुळे इथले रहिवासी भयभीत झाले होते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here