चुकीच्या उपचारांमुळे रुग्णाला गमवावे लागले प्राण, बोगस डॉक्टर दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल

140

पायाला झालेल्या जखमेवर उपचार करण्यासाठी डॉक्टरांकडे गेलेल्या एका व्यक्तीचा चुकीच्या उपचारामुळे मृत्यू झाल्याची घटना ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथे घडली. याप्रकरणी उपचार करणाऱ्या दोन बोगस डॉक्टरांवर भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

( हेही वाचा : आटपाडीत ख्रिस्त्री धर्मांतराचे कारस्थान; आमदार पडळकरांनी मांडली लक्षवेधी )

मुशर्रफ नूर मोहम्मद मोमीन असरफी आणि रायला मुशर्रफ असरफी असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या बोगस डॉक्टर दाम्पत्याचे नाव आहे. भिवंडीतील भुसार मोहल्ला या ठिकाणी या दाम्पत्याचे क्लिनिक आहे. त्याच परिसरात राहणारा तन्वीर मुस्तफा मोमीन (५२) यांच्या पायाला जखम झाल्यामुळे डॉक्टर मुशर्रफ यांच्या क्लिनिक मध्ये त्यांना उपचारासाठी आणण्यात आले होते. डॉक्टर दाम्पत्याने त्यांच्यावर चुकीचे उपचार केले, चुकीच्या उपचारामुळे मुस्तफा यांची प्रकृती अधिकच बिघडल्याने त्यांना धांगे रुग्णालयात आणण्यात आले, त्या ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला.

दरम्यान मृत मुस्तफा यांचा भाऊ तौकिर याने भावाच्या मृत्यू प्रकरणी अधिक माहिती काढली असता डॉक्टर मुशर्रफ आणि त्यांची पत्नी यांच्याकडे कुठल्याही प्रकारचे वैद्यकीय प्रमाणपत्र नसल्याचे कळले व त्यांनी चुकीचे उपचार केल्यामुळे मुस्तफा यांचा मृत्यू झाला असल्याची तक्रार तौकिर याने भिवंडी महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाकडे केली. दरम्यान आरोग्य विभागाकडे या तक्रारीची दखल घेत चौकशी सुरू केली. चौकशी दरम्यान डॉ. मुशर्रफ आणि त्याची पत्नी यांच्याकडे कुठल्याही प्रकारचे पदवी वैद्यकीय प्रमाणपत्र नसून मेडिकल कौन्सिलमध्ये त्यांची नोंद नसल्याचे आढळून आले. डॉ. मुशर्रफ आणि त्याची पत्नी मागील काही वर्षांपासून या परिसरात बेकायदेशीररित्या वैद्यकीय व्यवसाय करून नागरिकांच्या आरोग्याशी खेळत असल्याचे समोर आले. आरोग्य विभागाकडून भोईवाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी मुशर्रफ आणि त्याच्या पत्नी विरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.