Paytm च्या मुख्य कंपनीस ६११ कोटींची नोटीस; नेमके प्रकरण काय?

47
Paytm च्या मुख्य कंपनीस ६११ कोटींची नोटीस; नेमके प्रकरण काय?
Paytm च्या मुख्य कंपनीस ६११ कोटींची नोटीस; नेमके प्रकरण काय?

पेटीएमचे (Paytm) मुख्य कंपनी असणारी ‘वन ९७ कम्युनिकेशन लिमिटेड (One 97 Communication Limited) व तिच्या दोन उपकंपन्यांना सक्तवसुली संचालनालयाने (ED) ६११ कोटींची ‘ कारणे दाखवा नोटीस’ बजावली आहे. कंपनीवर परकीय चलन व्यवस्थापन कायद्याच्या (फेमा- Foreign Exchange Management Act) उल्लंघनाचा ठपका ठेवण्यात आला आहे. याप्रकरणी कायदेशीर प्रक्रिया सुरु होण्यापूर्वी ईडीच्या एका विशेष संचालकाने ही नोटीस बजावली आहे.

( हेही वाचा : Champions Trophy, Ind vs Aus : भारत वि. ऑस्ट्रेलिया सामन्यादरम्यान कसं असेल दुबईतील हवामान, मैदानावरील खेळपट्टी?)

या कंपनीने सिंगापूरमध्ये (Singapore) परकीय गुंतवणूक करून त्याबाबतची माहिती रिझर्व्ह बँकेला (Reserve Bank of India) न दिल्याचे तपासात समोर आले आहे. कंपनीने परदेशात उपकंपनी स्थापन करण्यासाठी ही गुंतवणूक केली होती. याचबरोबर परकीय गुंतवणूकदारांकडून कंपनीने थेट परकीय गुंतवणूक स्वीकारली असून, त्यासाठी देखील रिझर्व्ह बँकेच्या (Reserve Bank of India) नियमांचे पालन करण्यात आलेले नाही, असे नोटिशीत म्हटले आहे. दरम्यान यासंदर्भात ‘ओसीएल’सह या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक तसेत लिटील इंटरनेट प्रा. लि., नीअरबाय इंडिया प्रा. लि या उपकंपन्यांना ही ‘कारणे दाखवा नोटीस’ देण्यात आली आहे.

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.