Dawood Ibrahim : दाऊदचा बालेकिल्ला डोंगरातील पाकमोडिया स्ट्रीट वर ‘सन्नाटा’

दाऊद संदर्भात बोलण्यास कोणीही समोर येत नसून प्रत्येक जण 'हमको कुछ मालूम नही, हमभी टीव्ही पर सोशल मीडियासे पता चला है', या प्रकारची उत्तरे प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना देत आहे.

416
Dawood Ibrahim : दाऊद इब्राहिमच्या मालमत्तेचा लिलाव पार पडला, सर्वाधिक बोली २.०१ कोटी रुपये
Dawood Ibrahim : दाऊद इब्राहिमच्या मालमत्तेचा लिलाव पार पडला, सर्वाधिक बोली २.०१ कोटी रुपये

दाऊदचा बालेकिल्ला असणारा दक्षिण मुंबईतील डोंगरी इलाका आणि पाकमोडिया स्ट्रीटवर रविवार रात्री पासून सन्नाटा पसरला आहे. या ठिकाणी दाऊद संदर्भात बोलण्यास कोणीही समोर येत नसून प्रत्येक जण ‘हमको कुछ मालूम नही, हमभी टीव्ही पर सोशल मीडियासे पता चला है’, या प्रकारची उत्तरे प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना देत आहे. (Dawood Ibrahim)

हसीना पारकरची दहशत

कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम हा मुंबईच्या डोंगरी इलाक्यात लहानाचा मोठा झाला. डोंगरातील ‘पाकमोडिया स्ट्रीट’वर दाऊद आपल्या कुटुंबासोबत राहत होता, दाऊद इब्राहिमने दक्षिण मुंबईत गुन्हेगारीमध्ये दोन शतके गाजवली. या पाकमोडिया स्ट्रीटवर दाऊदला जवळून ओळखणारे अनेक जण आहेत, अगदी त्याच्यासोबत लहानपणी खेळणारे त्याचे दोस्त मंडळी देखील अजूनही या परिसरात राहतात. दाऊदची बहीण हसीना पारकरची एकेकाळी या परिसरात दहशत होती, तीच्या मृत्यूनंतर तीचे कुटुंब या परिसरात वास्तव्यास होते. हसीना पारकरचा मुलगा दानिश हा सध्या नागपाडा परिसरात राहतो, गुन्हेगारी क्षेत्रातील दाऊदचे एकेकाळचे अनेक सहकारी, खबरे, डोंगरीत राहण्यास आहे. (Dawood Ibrahim)

(हेही वाचा – Dawood Ibrahim : दाऊदच्या वृत्ताने गुन्हेगारी विश्वात खळबळ, दाऊदचे मुंबईतील नातलग मात्र चिडीचूप)

पाकमोडिया स्ट्रीटवर ‘सन्नाटा’

दाऊद इब्राहिमवर विषप्रयोग करण्यात आल्याचे वृत्त व्हायरल होताच मुंबईतील पोलीस यंत्रणा, तसेच प्रसार माध्यमे सतर्क झाली. प्रत्येक यंत्रणा आपापल्या परीने या वृत्ताची सत्यता जाणून घेण्याच्या प्रयत्नात आहे. सोमवारी सकाळीच प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी डोंगरी परिसरात फिरत होते, मात्र नेहमीपेक्षा सोमवारी डोंगरी, पाकमोडिया स्ट्रीटवर ‘सन्नाटा’ पसरला होता. दाऊद बाबत या ठिकाणी कोणी चकोर शब्द देखील बोलत नव्हते. डोंगरी, पाकमोडिया स्ट्रीट, तसेच दक्षिण मुंबईतून एकेकाळी पोलिस आणि गुन्हेगारी यांच्यासाठी खबऱ्याचे काम करणारे खबरे देखील अंडरग्राउंड झाले आहे. ‘हमको कुछ मालूम नही, हमभी टीव्ही पर सोशल मीडियासे पता चला है’, असे अनेकजण बोलत आहे. (Dawood Ibrahim)

हेही वाचा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.