बँकेत बनावट नोटा बदलण्यासाठी गेलेल्या एकाला अटक

158
बँकेत बनावट नोटा बदलण्यासाठी गेलेल्या एकाला अटक
बँकेत बनावट नोटा बदलण्यासाठी गेलेल्या एकाला अटक

ताडदेव येथील एका खासगी बँकेत २ हजार रुपयांच्या बनावट नोटा बदलण्याच्या प्रयत्न करणाऱ्या मुंब्रा कौसा येथील ३३ वर्षीय व्यक्तीला ताडदेव पोलिसांनी अटक केली. त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून पोलिसांनी तब्बल २ हजार रुपयांच्या १० बनावट नोटा जप्त केल्या आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ मे रोजी आरोपी एचडीएफसी ताडदेव शाखेत २ हजार रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी गेला तेव्हा नोटाबाबत संशय आल्याने बँक अधिकारी यांनी नोटांची पडताळणी करण्यासाठी २ हजाराच्या दहा नोटा मशीनमध्ये टाकल्या असता त्या नोटा बनावट असल्याचे समजले. बँक अधिकारी यांनी तात्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत सूचना दिली आणि पोलिसांना कळवले. ताडदेव पोलिसांनी बँकेत धाव घेऊन बनावट नोटा बदलण्यासाठी आलेल्या तरुणाला ताब्यात घेऊन त्याला पोलीस ठाण्यात आणले असता त्याची ओळख पटविण्यात आली. नाविद असफाक शेख (३३) असे या तरुणाचे नाव असून तो मुंब्रा कौसा येथे राहणारा आहे.

(हेही वाचा – मोबाईल चोरणाऱ्या झोमॅटो डिलिव्हरी बॉयला अटक; चार महागडे मोबाईल फोन जप्त)

याप्रकरणी पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. त्याने या बनावट नोटा कुठून आणल्या? तसेच यापूर्वी त्याने बनावट नोटा बाजारात वितरित केल्या का? याबाबत तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. यापूर्वी, ठाण्यातील नौपाडा पोलिसांनी राम मारुती रोड येथील बँकेच्या एटीएममध्ये ८ हजार रुपयांच्या बनावट नोटा जमा केल्याप्रकरणी एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.