महिलांनो सावधान! फेसबुकवर असलेल्या तुमच्या फोटोचा होतोय गैरवापर

93
सोशल मीडियावर स्वतःचे फोटो अपलोड करून लाईक आणि कमेंट मिळवण्याच्या नादात अनेकांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते. त्यातही महिलांनी सोशल मीडियावर अपलोड केलेल्या फोटोचा गैरवापर होत आहे. महिलांचे फोटो डेटिंग वेबसाईट, एस्कॉर्ट आणि मसाज सेंटरच्या वेबसाईटवर लावण्यात आल्याचे प्रकार समोर येत आहेत. मुंबईतील खार मध्ये असाच एक प्रकार उघडकीस आला असून, याप्रकरणी खार पोलिसांनी गुन्हा दाखल करून डेटिंग वेबसाईट चालवणाऱ्या महिलेला अटक केली आहे.
खार पश्चिम या ठिकाणी राहणारे एक गृहस्थ स्वतःच्या स्मार्ट फोनमध्ये ऑनलाइन डेटिंग अँप आणि बॉडी मसाज वेबसाईट शोधत असताना त्यांच्या स्मार्टफोनवर मसाज पब्लिक डॉट कॉम आणि फिमेल एस्कॉर्ट या नावाच्या वेबसाईट उघडल्या असता त्यांनी त्या वेबसाईटवर क्लिक करताच त्या वेबसाईटवर स्वतःच्या पत्नीचे आणि मानलेल्या बहिणीचे फोटो आणि त्याखाली त्यांच्या रेट आणि अश्लील मजकूर आढळून आला. पत्नी आणि बहिणीचे फोटो बघून या गृहस्थाला धक्काच बसला त्याने त्या वेबसाईटचे स्क्रीनशॉट काढून ते पत्नीला दाखवले असता तिलादेखील धक्का बसला, या गृहस्थाच्या पत्नीने हे फोटो ३ ते ४ वर्षांपूर्वी फेसबूकवर अपलोड केले होते, असे पतीला सांगितले.
या गृहस्थाने वेबसाईटवर दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून याबाबत जाब विचारला असता समोरून बोलणाऱ्या महिलेने काहीही उत्तर न देता फोन कट केला. या गृहस्थाने पुन्हा पुन्हा फोन लावण्याचा प्रयत्न केला मात्र त्याचा मोबाईल क्रमांक ब्लॉक केल्यामुळे फोन लागत नव्हता. अखेर या वेबसाईटच्या क्रमांकावर व्हाट्सअॅप कॉल केल्यानंतर या समोरच्या महिलेने त्यांना खार येथे एका ठिकाणी चर्चा करण्यासाठी बोलावले. हे गृहस्थ पत्नी आणि मानलेल्या बहीणीसह त्या ठिकाणी गेले असता उलट ही महिला या गृहस्थासोबत वाद घालू लागताच त्यांची पत्नी आणि बहीण पुढे आली व त्यांनी या महिलेला खार पोलीस ठाण्यात आणले आणि तक्रार दाखल केली.
खार पोलिसांनी रेश्मा रितेश यादव हिच्या विरुद्ध माहिती तंत्रज्ञान अधिनियम कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली आहे. या प्रकरणात तिच्याकडे कसून चौकशी केली जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.