IPL Cricket Betting Case : आयपीएल क्रिकेट स्पर्धेतील सामन्यावर बेटिंग प्रकरणी पिंपरी पोलिसांची कारवाई !

IPL Cricket Betting Case : आयपीएल क्रिकेट स्पर्धेतील सामन्यावर बेटिंग प्रकरणी पिंपरी पोलिसांची कारवाई !

51

आयपीएल क्रिकेट स्पर्धेतील सामन्यावर बेटिंगप्रकरणी (IPL Cricket Betting Case) पिंपरी पोलिसांनी कारवाई केली. यात पोलिसांनी दोन लाख २५ हजार ३५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पिंपरी येथील रिव्हर रोड येथे बुधवारी (दि. २६ मार्च) रात्री दहाच्या सुमारास ही कारवाई केली. मयूर चंदर मेवानी (वय २५), धीरज चंदर मेवानी (२३) आणि आकाश हरेश आहुजा (२२, तिघेही रा. पिंपरी) यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिस अंमलदार विष्णू भारती यांनी फिर्याद दिली. (IPL Cricket Betting Case)

हेही वाचा-CM Devendra Fadnavis यांच्या १०० दिवसांच्या कृती आराखड्यामुळे कार्यालये टाकताहेत कात!

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी रिव्हर रोड येथे बंद खोलीत मयूर मेवानी, धीरज मेवानी आणि आकाश आहुजा हे आयपीएल क्रिकेट स्पर्धेतील राजस्थान रॉयल्स विरुद्ध कोलकत्ता नाईट रायडर्स या संघांमध्ये सुरू असलेल्या सामन्यावर बेटिंग घेत असल्याची माहिती मिळाली. (IPL Cricket Betting Case)

हेही वाचा- भाजपा आमदार Chitra Wagh यांचा उद्धव ठाकरेंना टोला; म्हणाल्या, तुम्ही इफ्तार पार्टीची तयारी…

त्यानुसार पोलिसांनी कारवाई केली. यावेळी संशयित हे क्रिकेट लाइन गुरू या सोशल मीडिया ॲपद्वारे बेटिंग घेत होते. पोलिसांनी संशयितांकडून दोन लाख २५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. यात पाच मोबाइल फोन, डायरी, कागद, लिफाफा, तीन पेन व रोख रकमेचा समावेश आहे. (IPL Cricket Betting Case)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.