पंतप्रधान कार्यालयात अधिकारी असल्याचे सांगून सरकारी संस्थामध्ये नोकरी देण्याचे अमिष दाखवून अनेकांची फसवणूक करणाऱ्या एका भामट्याला मीरा रोड येथून अटक करण्यात आली आहे.
अजित कुमार डे (४३) असे अटक करण्यात आलेल्या भामट्याचे नाव आहे. मिरा रोड येथील काशीमिरा येथे राहणारा अजित कुमार डे याच्यावर मुंबई, ठाणेसह औरंगाबाद, गुजरात राज्यात अनेक फसवणुकीचे गुन्हे दाखल आहे. तक्रारदार हा मिरा भायंदर, वसई विरार पोलीस आयुक्तलयाच्या हद्दीतील उत्तन येथे राहणारे आहे. काही महिन्यांपूर्वी एका तक्रारदार याची ओळख झाली होती, त्याने स्वतःची ओळख केंद्रात पंतप्रधान कार्यालयात आधिकरी असल्याचे सांगितले होते. त्याने तक्रादाराला केंद्रीय सरकारी नोकरी लावून देतो असे सांगून १५ लाख रुपये उकळले, अनेक महिने उलटून देखील नोकरी लागत नसल्याने आपली फसवणूक झाली असल्याचे कळताच तक्रारदार याने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
(हेही वाचा PM Narendra Modi : पंतप्रधान झाल्यापासून नरेंद्र मोदी यांचे 64 परकीय दौरे)
पोलिसांनी तक्रारदार यांनी दिलेल्या वर्णना वरून शोध सुरू केला, आरोपी हा काशीमिरा येथे राहण्यास असल्याची माहिती पोलिसांना मिळाली, पोलिसांनी शोध घेऊन अजित कुमार डे याला मिरा रोड परिसरातून अटक करण्यात आली. पोलिसांच्या चौकशीत अजित कुमार डे हा सरकारी आधिकरी नसून तो प्रत्येकाला पंतप्रधान कार्यालयात अधिकारी असल्याचे सांगून नोकरीच्या नावाखाली लोकांची फसवणूक करीत होता, त्याच्यावर गुजरात, औरंगाबाद, मुंबई, ठाण्यात या प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. पोलिस अधिका-यांनी सांगितले की, आरोपी हा सराईत गुन्हेगार असून यापूर्वीही त्याला ३९लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. तो मीरा-भाईंदर परिसरात कार्यरत होता.आम्ही तत्काळ डे यांच्या निवासस्थानाची झडती घेतली आणि तेथून त्याला अटक केली. डे यांनी फसवणूक केल्याची कबुली दिली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
Join Our WhatsApp Community