पुण्यात PMPML च्या चालकाने मद्यपान करून बस चालवल्याने भीषण अपघात झाला आहे. (PMPML) सेनापती बापट रोड वर एका वाहनचालकाशी वाद झाल्याने पीएमपीएल बसचालकाने १० ते १५ गाड्या उडवल्या आहेत. पोलिसांनी बस चालकाला अटक केली आहे. नीलेश सावंत असे या बसचालकाचे नाव आहे. या पीएमपीएल बसचालकावर ३०८ अंतर्गत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (PMPML)
(हेही वाचा – Nawaz Sharif : शेजारच्या देशाबरोबर मैत्रीपूर्ण संबंध हवेत; नवाझ शरीफ यांना उपरती)
या पीएमपीएल बसमध्ये 50 प्रवासी प्रवास करत होते. बसचालकाने दारूच्या नशेत बस उलटी चालवल्याचा आरोप बसमधील प्रवाशांनी आणि स्थानिकांनी केला आहे. कृष्णा जाधव यांनी जीवाची परवा न करता या लोकांना वाचवले. चतु:श्रृंगी पोलीस स्टेशनमध्ये बसचालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एका चालकाशी वाद झाल्यानंतर रागाच्या भरात त्याने बस रिव्हर्स घेत काही गाड्यांना उडवले आहे. ही घटना घडत असतानाच बसमधील प्रवाशांनी ओरडून मदत मागितली. पण बस चालकाने बस थांबवली नाही. यामध्ये काही गाड्याचे नुकसान झाले आहे. तर काही लोक जखमी देखील झाले आहेत.
यापूर्वी संतोष माने या PMPML बसचालकाने मद्यधुंद स्थितीत बस चालवून अनेक गाड्यांना ठोकर दिली होती. 25 जानेवारी 2012 रोजी पुण्यातील स्वारगेट पीएमटी स्थानकातून एक बस पळवून नेत संतोष मानेने 9 जणांना चिरडले होते. तर 37 जण जखमी झाले होते. या प्रकरणी त्याला जन्मठेपेची शिक्षाही झाली आहे. (PMPML)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community