Drugs च्या धंद्याला पोलिसांचा हातभार; लातूरमध्ये अमली पदार्थांचा बेकायदेशीर कारखाना उद्ध्वस्त

70
Drugs च्या धंद्याला पोलिसांचा हातभार; लातूरमध्ये अमली पदार्थांचा बेकायदेशीर कारखाना उद्ध्वस्त
  • प्रतिनिधी 

महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) लातूर जिल्ह्यातील एका गावात असणाऱ्या ‘एमडी’ ड्रग्जचा (Drugs) कारखाना उद्ध्वस्त केला आहे. या ड्रग्जच्या धंद्यासाठी मुंबईतून आर्थिक पुरवठा करण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती डीआयआरच्या हाती लागली आहे. याप्रकरणी मीरा भाईंदर-वसई विरार पोलिस दलातील एका पोलीस हवालदारासह सात जणांना अटक करण्यात आली आहे. ड्रग्जचे हे मोठे सिंडिकेट असून या सिंडिकेटमधील आणखी मोठे नावे समोर येण्याची शक्यता डीआयआरच्या सूत्रांनी वर्तवली आहे.

(हेही वाचा – Karnataka Cooperative Bank च्या माजी अध्यक्षांना अटक; ६३ कोटी रुपयांच्या फसवणुकीचा आरोप)

महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) मुंबई युनिटने मंगळवारी लातूरच्या एका गावात मेफेड्रोन बनवण्याचा बेकायदेशीर कारखाना उद्ध्वस्त केला आहे. घटनास्थळी एका पोलिसासह पाच आरोपींना अटक करण्यात आली. तर सिंडिकेटचा फायनान्सर आणि वितरक यांना मुंबईतून अटक करण्यात आली आहे. डीआयआरने या कारखान्यातून १७ कोटी रुपयांचा ११.३६ किलोचा साठा जप्त केला आहे. सिंडिकेटच्या मेफेड्रोन किंवा एमडी बनवण्याच्या कारवायांची माहिती मिळाल्यानंतर डीआरआयने या गुप्त कारखान्याचा पर्दाफाश केला, असे डीआयआरच्या सूत्रांनी सांगितले. लातूरच्या रोहिणा गावातील दुर्गम डोंगराळ भागात हा कारखाना उभारण्यात आला होता असे डीआरआयच्या सूत्रांनी सांगितले. या कारखान्यावर केलेल्या शोध मोहिमेदरम्यान, ११.३६ किलो मेफेड्रोन – ८.४४ किलो कोरड्या स्वरूपात आणि २.९२ किलो द्रव स्वरूपात जप्त करण्यात आले. अटक करण्यात आलेल्या आरोपींवर अमली पदार्थ (Drugs) प्रतिबंधक कायदा, १९८५ च्या संबंधित तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे आहे.

(हेही वाचा – BDD Chawl च्या रहिवाशांची पुनर्विकासामध्ये फसवणूक?)

डीआयआरने अटक करण्यात आलेल्या आरोपीपैकी अटक करण्यात आलेला पोलीस हवालदार हा नयानगर पोलीस ठाण्यात कार्यरत होता. त्याचे गाव लातूर जिल्ह्यात असून या पोलीस कर्मचाऱ्याने एमडी (Drugs) बनविण्यासाठी लातूर जिल्ह्यातील दुर्गम स्थळ निवडले होते, त्यासाठी त्याने मुंबईतून आर्थिक पुरवठा उभा केला होता. या धंद्याला आर्थिक पुरवठा करणाऱ्यांमध्ये काही मोठी नावे असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून लवकरच या नावाचा उलगडा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.