-
प्रतिनिधी
अनुसूचित जाती आणि जमाती प्रतिबंधक कायद्याखाली दाखल झालेल्या गुन्ह्यात आरोपींच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात पोलिसांकडून चालढकल होत असल्याची लेखी तक्रार या प्रकरणातील फिर्यादी महिलेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. आरोपींच्या विरोधात सबळ पुरावे आणि बोरिवली पोलीस ठाण्यात घडलेल्या ॲट्रोसिटीच्या घटनेची तपशीलवार माहिती असतानाही पोलिसांकडून कारवाई होत नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. (Atrocity)
यासंदर्भातील अधिक माहिती अशी की, नवी मुंबईत राहणाऱ्या बौद्ध समाजातील अपर्णा जाधव (नाव बदलले आहे) या घटस्फोटीत महिलेचा साडेतीन वर्षापूर्वी अमेरिकास्थित अमीरअली हाजीयानी या मुस्लिम खोजा समाजातील व्यक्तीशी पुनर्विवाह झाला. हा विवाह पुण्यात निवडक नातेवाईक आणि परिचितांच्या उपस्थितीत बौद्ध पद्धतीने पार पडला. मात्र, लग्नानंतर काही दिवसातच अपर्णा यांना हाजीयानी कुटुंबाकडून मानसिक छळाबरोबर जातीय द्वेष आणि भेदभावाला सामोरे जावे लागले. याशिवाय हाजीयानीने त्याच्या पहिल्या पत्नीने अमेरिकेत दाखल केलेली कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार अपर्णा यांच्याकडून लपवून ठेवली. तसेच गेली वर्षभर हाजीयानीने अपर्णा यांच्याशी संपर्क ठेवलेला नाही. (Atrocity)
(हेही वाचा – Raj Thackeray यांना दिलासा, मुंबई उच्च न्यायालयाने केली निर्दोष सुटका, काय आहे प्रकरण?)
त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच अपर्णा यांनी ४ जुलै २०२४ रोजी बोरिवली पोलीस ठाण्यात जातीय द्वेष आणि भेदभावातून सतत अपमानित करून परिवारात सामावून न घेता अलिप्त ठेवले जात असल्याबद्दल नवरा, सासू, जाऊ आणि कुटुंबातील अन्य सदस्यांच्या विरोधात कौटुंबिक हिंसाचार तसेच ॲट्रोसिटीची तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी सासू नसीम हाजीयानी आणि जाऊ रेश्मा हाजीयानी यांना चौकशीसाठी बोलवले असता या दोघींनी, अपर्णा आमच्या समाजाची नाही. ती वेगळ्या जातीची असल्याचे सांगून नांदवण्यास स्पष्ट नकार दिला. ही घटना समक्ष घडूनही पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेताना अनुसूचित जाती आणि जमाती प्रतिबंधक कायद्यातील महत्वाची कलमे लावली नाहीत. या विरोधात अपर्णा यांनी अनुसूचित जाती, जमाती आयोगाकडे तक्रार केली. (Atrocity)
त्यानंतर आयोगाच्या आदेशानुसार ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, यापूर्वी बोरिवली पोलिसांकडून योग्य चौकशी न झाल्याने फिर्यादी अपर्णा यांच्या मागणीवरून हा तपास गोरेगाव पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला. पुढे आयोगाच्या निर्देशानुसार बोरिवली पोलीस ठाण्यातील घटनेबाबत ॲट्रोसिटीचे कलम लावून गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी गोरेगाव पोलिसांनी चौकशीला बोलावूनही आरोपी हजर झाले नाहीत. आरोपी गैरहजर राहिल्याबद्दल पोलिसांनी त्यावर कोणतीही कारवाई केली नाही. आयोगाचा आदेश असूनही पोलीस ॲट्रोसिटीच्या गुन्ह्याचा योग्यरित्या तपास करत नसल्याबद्दल शेवटी हतबल झालेल्या अपर्णा जाधव यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र लिहून कायदेशीर कारवाईची आणि आपल्याला न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे. (Atrocity)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community