पुण्यातून तब्बल 105 कोयते पोलिसांनी केले जप्त

125
कोयता टोळीला थेट प्राणघातक शस्त्रांचा पुरवठा करणाऱ्या दुकानदाराला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. यामध्ये पोलिसांनी 105 कोयते जप्त केले आहेत. नुकतेच जंगली महाराज रस्त्यावरील खाऊ गल्लीमध्ये कोयत्याचा धाक दाखवून एका महिला विक्रेत्याला धमकावल्याची घटना घडली आहे. त्यामुळेच कोयत्या गॅंगला रोखणे पोलिसांसमोर मोठे आव्हान बनले आहे.

मध्य प्रदेशातील आहे कोयता विक्रेता 

हुसेन राजगरा असे दुकान मालकाचे नाव आहे. फरासखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रविवार पेठेत बोहरी अली येथे राजगडाचे दुकान आहे. तो मध्य प्रदेशातील नागरिक आहे. पोलिस तपासात तो दुकानदार राजगरा येथून अनेक तरुणांना कोयत्याचा पुरवठा करत असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली. पुण्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी पार्श्वभूमीचे तरुण कोयत्याच्या माध्यमातून दहशत निर्माण करत आहेत. गेल्या 1 महिन्यात 8 ते 10 ठिकाणी या घटना घडल्या आहेत. पोलिसांची ही कारवाई कौतुकास्पद आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.