Mumbai Police : व्यापाऱ्याची ४२ लाख रुपयांची हरवलेली बॅग अशी शोधली पोलिसांनी

252
Police Recruitment : मैदानासाठी मुंबई पोलिसांची वणवण

दक्षिण मुंबईतील एका व्यापाऱ्याची ४२ लाख रुपये रोकड असलेली बॅग शोधण्यासाठी पोलिसांना ई-चलन मशीनची मदत घेतली, या मशीनच्या मदतीने पोलिसांनी टॅक्सीचा शोध घेत टॅक्सी चालकाच्या ताब्यातून ४२ लाख रुपये रोकड असलेली बॅग घेऊन व्यापाऱ्याला देण्यात आली. पंतनगर पोलिसांनी २४ तासात टॅक्सीत विसरलेल्या बॅगेचा शोध घेऊन व्यापाऱ्याला परत दिल्यामुळे व्यापाऱ्याने मुंबई पोलिसांचे मनापासून आभार मानले आहे.

दक्षिण मुंबईत राहणारे व्यापारी अल्पेश लापसिया (३८) यांनी घाटकोपर (पूर्व) येथील पंतनगर पोलिस ठाण्यात सोमवारी हरवलेल्या बॅगबद्दल तक्रार दाखल केली होती. सोमवारी रात्री उशिरा दक्षिण मुंबईतील गुलालवाडी ते घाटकोपर असा प्रवास करत असलेल्या टॅक्सीमध्ये ४२ लाख रुपये रोकड असलेली बॅग विसरल्याची माहिती अल्पेश यांनी पोलिसांना दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी बॅगेचा शोध घेण्यास सुरूवात केली.

पोलिसांनी अल्पेश हे व्यापारी प्रवास करीत असलेल्या टॅक्सीचा शोध घेण्यासाठी गुलालवाडी ते घाटकोपर दरम्यान असलेले सीसीटीव्ही फुटेज तपासले मात्र, पावसामुळे फुटेज अस्पष्ट असल्यामुळे टॅक्सीबाबत कुठलीही माहिती मिळत नव्हती. दरम्यान पोलिसांनी वाडीबंदर सिग्नलवर बसवलेले कॅमेरे तपासले असता त्यांना अल्पेश प्रवास करीत असलेली टॅक्सी फुटेज मध्ये दिसून आली. त्या आधारे पोलिसांनी टॅक्सीचा क्रमांक मिळवून वाहतूक विभागाच्या ई-चलन मशीन मध्ये सदर क्रमांक तपासला असता टॅक्सीची आणि मालकाची माहिती मिळाली.

(हेही वाचा – रामदास आठवले यांनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सदिच्छा भेट)

ही टॅक्सी ताडदेव येथील रहिवासी असलेल्या व्यक्तीच्या नावे असल्याचे समोर आले. पोलीस पथक टॅक्सीचालकाच्या घरी गेले व टॅक्सी मिळालेल्या रोकड सह टॅक्सी चालकाला ताब्यात घेऊन पंतनगर पोलिस ठाण्यात दाखल झाले, प्रवासी टॅक्सीत विसरून गेलेली बॅग नजीकच्या पोलीस ठाण्यात जमा न करता टॅक्सी चालकाने त्यातील रोकड बघून बॅग थेट घरी घेऊन गेला होता, सुदैवाने तो रोख रकमेसह मुंबई बाहेर पळून न गेल्यामुळे तो पोलिसांना सापडला. मात्र, बॅग व त्यातील रक्कम सुखरूप मिळाल्याने तक्रारदार व्यापारी याची टॅक्सी चालकाविरुद्ध कुठलीही तक्रार नसल्यामुळे पोलिसांनी टॅक्सी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल न करता त्याला सोडून दिले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.