केंद्रीय मंत्री Raksha Khadse यांच्या मुलीची छेडछाड काढणारे राजकीय पक्षाचे कार्यकर्ते; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला संताप

122

जळगावमधील मुक्ताईनगरमध्ये (Jalgaon Muktainagar) एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुक्ताईनगर येथील यात्रा महोत्सवादरम्यान काही टवाळखोर तरुणांनी केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेत्या रक्षा खडसे (Raksha Khadse) यांच्या मुलीसह इतर मुलींची छेडछाड काढली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. सुरक्षारक्षकाच्या तक्रारीवरून संबंधित तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच छेडछाड करणारे एका विशिष्ट पक्षाचे कार्यकर्ते असल्याचा धक्कादायक खुलासा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी केला आहे. या घटनेतील कुणालाही सोडणार नाही असा संतप्त इशाराही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.  (Raksha Khadse)

(हेही वाचा – Vasai Road Railway Station : तुम्हाला माहित आहे का, वसई स्टेशनचे जुने नाव काय आहे ?)

पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना फडणवीसांनी (CM Devendra Fadnavis Press Conference) जळगावातील घटनेवर भाष्य केले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, दुर्दैवाने त्या घटनेत एका विशिष्ट पक्षाचे पदाधिकारी आहेत ज्यांनी अतिशय वाईट प्रकारचं काम केले आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून काहीना अटकही झाली आहे. इतरांनाही अटक केली जाईल. सार्वजनिक ठिकाणी अशाप्रकारे त्रास देणे, छेडछाड करणे हे अत्यंत चुकीचे आहे. कुठल्याही परिस्थितीत अशा लोकांना माफी देता कामा नये. त्यांच्यावर अतिशय कडक कारवाई केली जाईल असं विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी केले.

नेमकी घटना काय घडली ?

केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीबरोबरच इतर मुलींची टवाळखोर मुलांकडून यात्रेत छेड काढण्यात आली. यावेळी रक्षा खडसे यांच्या मुलीसोबत असलेल्या सुरक्षारक्षकाने टवाळखोरांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपींनी त्याला देखील धक्काबुक्की केली. यात्रेत ज्या मुलींची छेडछाड करण्यात आली त्यात काही अल्पवयीन मुलींचाही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर सुरक्षारक्षकाने मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार अनिकेत भोई, पियुष मोरे, सोम माळी, अतुल पाटील, किरण माळी या सर्वांविरुद्ध मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात (Muktainagar Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर काहींना अटक करण्यात आली आहे.

(हेही वाचा – Dehradun मध्ये प्रशासकीय पथकाने ४ बेकायदेशीर मदरशांना टाळे ठोकले; अवैध मशिदीवरही कारवाई)

यावेळी मुक्ताईनगर पोलीस स्टेशनमध्ये (Muktainagar Police Station) रक्षा खडसे नागरिकांसह कार्यकर्त्यांनी मोठा जमाव गोळा झाला आहे. या प्रकरणामुळे राज्यातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. आमच्यासारख्या परिवाराच्या मुलीच जर सुरक्षित नसतील तर बाकीच्यांचं काय? असा सवाल रक्षा खडसेंनी पोलिसांना विचारल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.