वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर (Pooja Khedkar) आणि त्यांच्या कुटुंबांला कोणाचा राजकीय वरदहस्त आहे याची चर्चा सुरु असताना खेडकर कुटुंबीयांचे भाजप नेत्या पंकजा मुंडेंसोबत (Pankaja Munde) असलेले संबंध समोर आलेत. पंकजा मुंडे अध्यक्ष असलेल्या गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान या ट्रस्टला पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांनी 12 लाख रुपयांची देणगी दिल्याचं समोर आलं आहे. 3 ऑक्टोबर 2023 रोजी एका चेकच्या माध्यमातून ही देणगी देण्यात आली आहे.
दिलीप खेडकर हे भाजपशी संबंधित
स्वतः दिलीप खेडकर हे भाजपशी संबंधित राहिले आहेत. मात्र लोकसभा निवडणुकीच्या आधी भाजपमधून तिकीट न मिळाल्याने ऐनवेळी त्यांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश करुन लोकसभेची निवडणूक लढवली होती. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना लोकसभेची उमेदवारी मिळावी यासाठी दिलीप खेडकर यांनी पाथर्डीमधील मोहटा देवीला दीड किलोचा चांदीचा मुकुटदेखील अर्पण केला होता. त्याचबरोबर दिलीप खेडकर यांचे भाऊ माणिक खेडकर हे पाच वर्षांपासून भाजपचे पाथर्डी तालुका अध्यक्ष राहिलेले आहेत. (Pooja Khedkar)
खेडकर कुटुंबाचा पुणे ग्रामीण पोलिसांकडून शोध सुरु
खेडकर कुटुंबाचा पुणे ग्रामीण पोलिसांकडून शोध सुरु करण्यात आला असून खेडकर कुटुंबाशी संपर्क होत नसल्याच पुणे पोलिसांच म्हणणं आहे. खेडकर कुटुंब आणि त्यांच्यासह गुन्हा दाखल करण्यात आलेल्या सात जणांचा शोध घेण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखेची तीन पथके तयार केली आहेत. पौड पोलिसांच्या मदतीने खेडकर कुटुंबाचा शोध घेतला जातोय. या सर्वांचे मोबाईल फोन देखील स्वीच ऑफ असल्याचं पोलिसांच म्हणणं आहे. पुणे पोलिसांनी रविवारी खेडकर कुटुंबाच्या पुण्यातील बाणेर भागातील बंगल्यात जाऊन तपासण्याचा प्रयत्न केला. मात्र बंगल्याचे गेट बंद असल्याचे आढळून आल्यानंतर पोलिसांनी या बंगल्याचे चित्रिकरण केले आहे. (Pooja Khedkar)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community