महाराष्ट्र ATS ची कारवाई; नाशिकमधून आणखी एक PFI कार्यकर्ता ताब्यात

211

गेल्या काही दिवसांपासून पीएफआय संघटना चर्चेत आहे. नाशिकमध्ये काही संशयितांना न्यायालयात हजर केले असताना, धक्कादायक खुलासे समोर आले होते. त्यानंतर नाशिकमधून पुन्हा एका पदाधिका-याला एटीएसने ताब्यात घेतले असून, त्याला न्यायालयात हजर करण्यात आले आहे. त्यामुळे पीएफआयची पाळेमुळे नाशिकमध्ये खोलवर पसरल्याचे दिसून येत आहे.

महिन्याभरापूर्वी राष्ट्रीय तपास संस्था व एटीएसने देशभरात छापेमारी केल्यानंतर केंद्र सरकारनेदेखील गंभीर दखल घेत पीएफआय संघटनेवर बंदी घातली. त्यानंतर राज्यातील अनेक भागातूनदेखील पीएफआयच्या पदाधिका-यांना एटीएसने ताब्यात घेतले. तर राज्यातील जिल्ह्यात असलेल्या पीएफआयच्या कार्यालयांनादेखील टाळे ठोकण्यात आले. मात्र, त्यानंतरदेखील एटीएसची कारवाई सुरु असून, नाशिकमधून पीएफआयच्या आणखी एका सदस्याला ताब्यात घेण्यात आले आहे. त्यामुळे पीएफआय प्रकरणाची व्याप्ती वाढल्याचे दिसून येत आहे.

( हेही वाचा: हलाल उत्पादनांची सक्ती का? ट्विटरवर सुरू आहे ‘हलालमुक्त दिवाळी’ ट्रेंड )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.