Mumbai Police : पुन्हा एकदा पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन

मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला शनिवारी सायंकाळी धमकीचा फोन आला होता. पोलिसांनी या आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.

185
Mumbai Police : रिकव्हरीच्या नावाखाली वसुली; महिला पोलीस अधिकाऱ्यांसह तिघांवर विभागीय चौकशीचे आदेश

सध्या गेल्या काही दिवसात अनेकवेळा मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन आल्याच्या घटना घडत आहे. अशाच प्रकारे धमकी देणारा फोन मुंबई नियंत्रण कक्षाला शनिवारी (३० डिसेंबर) संध्याकाळी आला होता. त्यामुळे पोलीस यंत्रणा अलर्ट झाली आहे. (Mumbai Police)

मुंबईत बॉम्बस्फोट होणार असल्याची शक्यता असल्याचे सांगत त्या व्यक्तीने सांगितले आहे. एकच वाक्य बोलून त्याने लगेचच फोन कट केला. त्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. शनिवारी सायंकाळी ६ च्या सुमारास हा फोन आला होता. पोलिसांनी या अज्ञात व्यक्तीचा शोध घेत आहे. तर प्राथमिक तपासात फोन  जे.बी नगर एअरपोर्ट रेसिडेन्सी कॉम्प्लेक्समधून फोनचे लोकेशन असल्याचे समजले आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे.

(हेही वाचा : Siddhivinayak Temple : नवीन वर्षाची सुरुवात सिद्धिविनायकाच्या दर्शनाने करायची आहे; जाणून घ्या काय आहे मुखदर्शनाची वेळ)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ,मुंबई पोलीस नियंत्रणाला धमकीचा फोन आला, त्यावेळी ज्याने कॉल केला त्याने मुंबईत बॉम्बस्फोट होणार असल्याचा दावा केला आणि असे सांगितल्यावर कॉल डिस्कनेक्ट केला. पोलिसांनी अनेक ठिकाणी तपास सुरू केला आहे, मात्र अद्याप काहीही संशयास्पद आढळले नाही. पोलिस सध्या ज्याने कॉल केला त्याचा तपशील जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.