मुंबईमध्ये अतिक्रमण (Powai Bheemnagar) कारवाईदरम्यान नागरिकांनी दगडफेक केल्याची घटना समोर आली आहे. मुंबईतल्या पवई परिसरात ही घटना घडली आहे. अतिक्रमण कारवाई करत असताना पालिका कर्मचारी आणि पोलिसांत दगडफेक करण्यात आली आहे. या दगडफेकीमध्ये ५ पोलिस जखमी झाले आहे. घटनास्थळावर स्थानिकांकडून आंदोलन सुरू होते. त्याचवेळी ही घटना घडली आहे. सध्या घटनास्थळी पोलिसांचा कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. (Powai Bheemnagar)
(हेही वाचा –Tourist Places In Himachal Pradesh : हिमाचल प्रदेशमध्ये पाहण्यासारखी ५ प्रमुख ठिकाणे!)
मिळालेल्या माहितीनुसार, पवईतल्या जय भीम नगर (Powai Bheemnagar) परिसरामध्ये पालिकेकडून अतिक्रमण कारवाई सुरू आहे. अतिक्रमण कारवाईला स्थानिक नागरिकांनी विरोध केला. यावेळी नागरिकांनी झोपडपट्टी वाचवण्यासाठी आंदोलन केले. अतिक्रमण काढत असताना संतप्त झालेल्या नागरिकांनी पालिका कर्मचारी आणि पोलिसांवर दगडफेक केली. अतिक्रमण विरोधी पथकावर स्थानिकांनी केलेल्या दगडफेकीमध्ये ५ ते ६ पोलिस जखमी झाले आहेत. (Powai Bheemnagar)
(हेही वाचा –PM Narendra Modi यांच्या शपथविधिला ‘या’ देशांचे प्रमुख पाहुणे राहणार उपस्थित!)
दोन महिन्यांपूर्वी या झोपडपट्टी भागात आगीची घटना घडली होती त्यानंतर या ठिकाणच्या झोपडपट्टीत (Powai Bheemnagar) राहणाऱ्या रहिवाशांना मुंबई महापालिकेकडून जागा खाली करण्याची नोटीस पाठवण्यात आली होती. त्यानंतर आज कारवाईसाठी अधिकारी आले असताना अधिकाऱ्यांवर जमावाने दगडफेक केली. रहिवासी आक्रमक झाल्यानंतर तात्काळ मुंबई महापालिकेने कारवाई थांबवली. (Powai Bheemnagar)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community