पवईतील जयभीम नगर (Powai Bheemnagar ) येथे गुरुवारी, (६ जून) दुपारी अतिक्रमण कारवाईदरम्यान पोलीस आणि महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यावर दगडफेक केली. पवई पोलिसांनी २०० हून अधिक जणांविरुद्ध दंगल, सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, सरकारी अधिकारी-कर्मचारी यांना मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान ताब्यात घेण्यात आलेल्या २० दंगेखोरांना अटक करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या दगडफेकीत सहाय्यक पोलीस आयुक्तांसह १५ पोलीस आणि १० मनपा कर्मचारी आणि अधिकारी जखमी झाले आहेत. पवई पोलिसांनी ताब्यात घेण्यात आलेल्या दंगेखोरांना अटक करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. (Powai Bheemnagar )
(हेही वाचा- Monsoon 2024 : मुंबईकर अजूनही मान्सूनच्या प्रतिक्षेतच! जाणून घ्या हवामान खात्याचा अंदाज)
पवईतील जयभीम नगर (Powai Bheemnagar ) या ठिकाणी असलेल्या झोपड्यांवर कारवाई करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेचे अतिक्रमण विभागाचे अधिकारी, कर्मचारी पोलिसांच्या बंदोबस्तात गुरुवारी सकाळी जयभीम नगर (Powai Bheemnagar ) येथे दाखल झाले.अतिक्रमण विभागाच्या अधिकारी यांनी येथील नागरिकांना झोपड्या रिकाम्या करण्यास सांगितले. येथील ३०० ते ३५० जणांचा जमाव गोळा झाला, त्यात मोठ्या प्रमाणात महिला आणि तरुणाचा मोठा सहभाग होता. संतप्त जमावाने या कारवाईला विरोध करण्यास सुरुवात केली. दरम्यान बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनी या संतप्त जमावाला शांत राहण्याचा व सरकारी कामात अडथळा आणू नका, असे समजाविण्याचा प्रयत्न केला; परंतु संतप्त झालेल्या जमावाने अतिक्रमण विरोधी पथकावर आणि पोलिसांवर दगडफेक सुरू केली. या दगडफेकीत सहाय्यक पोलीस आयुक्त भरत सोनवणे यांच्यासह १५ पोलीस आणि १० मनपा अधिकारी आणि कर्मचारी जखमी झाले. संतप्त झालेल्या जमावावर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांची अधिक कुमक मागविण्यात आली, पोलिसांनी दगडफेक करणाऱ्यापैकी २० ते २५ जणांना ताब्यात घेऊन त्यांना पवई पोलीस ठाण्यात आणण्यात आले. संतप्त झालेल्या जमावाला सौम्य बळाचा वापर करून पांगविण्यात आले. दरम्यान महानगरपालिकेने ( Municipal Administration) या दगडफेकीच्या घटनेनंतर कारवाई तात्पुरती थांबविण्यात आली आहे. जखमी झालेल्या पोलीस आणि मनपा कर्मचाऱ्यांना उपचारासाठी नजीकच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (Powai Bheemnagar )
या घटनेप्रकरणी पवई पोलिसांनी २००हून अधिक जणांविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलमांखाली बेकायदेशीरपणे एकत्र येणे, दंगल, प्राणघातक हल्ला, सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, सरकारी कर्मचारी यांना त्याचे कर्तव्य बजावण्यापासून परावृत्त करणे याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच ताब्यात घेण्यात आलेल्यांना अटक करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. (Powai Bheemnagar )
हेही पहा-