मुंबईतील प्रसिद्ध देवस्थान सिद्धिविनायक मंदिरात (Siddhivinayak Temple) व्हीआयपी दर्शनाच्या नावाखाली भक्तांकडून हजारो रुपये उकळणाऱ्या टोळी विरुद्ध दादर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सिद्धिविनायक मंदिर (Siddhivinayak Temple) व्यवस्थापकांनी केलेल्या तक्रारी नंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला असून या दर्शनासाठी पैसे घेणाऱ्या टोळीमध्ये स्थानिक फुलविक्रेते आणि मंदिर ट्रस्टच्या जनसंपर्क कार्यालयातील कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. (Siddhivinayak Temple)
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी प्रभादेवी येथील सिद्धीविनायक मंदिर (Siddhivinayak Temple) ट्रस्टचे व्यवस्थापक संजीव पवार यांनी दिलेल्या तक्रारीवरून ६ अनोळखी व्यक्तींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही आठवड्यापूर्वी सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी आलेल्या एका महिला आणि दोन पुरुषांनी मंदिर ट्रस्टकडे तक्रार दाखल केली होती, व श्रींच्या दर्शनासाठी तीन ते चार हजार रुपये घेऊन थेट गाभाऱ्यात दर्शनासाठी सोडले जात असल्याचे तक्रारीत म्हटले होते. बेकायदेशीरपणे पैसे घेऊन थेट गाभाऱ्यात दर्शनासाठी सोडण्याचे काम मंदिर ट्रस्टचे कर्मचारी आणि परिसरातील फुल विक्रेते करीत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. (Siddhivinayak Temple)
(हेही वाचा – Pranab Mukherjee : सोनिया मला पंतप्रधान बनवणार नाहीत; प्रणव मुखर्जींनी २००४ मध्ये कन्येकडे व्यक्त केली होती भावना)
ट्रस्टच्या जनसंपर्क कक्षातील कर्मचारी संतोष दळवी आणि फुल विक्रते यांच्याकडून हा गैरप्रकार सुरू असल्याचे हाती लागलेल्या पुराव्यावरून व्यवस्थापन मंडळाच्या लक्षात आल्यानंतर व्यवस्थापक संजीव पवार यांनी दादर पोलीस ठाण्यात ६ जणांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. दादर पोलिसांनी (Dadar Police) याप्रकरणी ६ जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नसून तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. (Siddhivinayak Temple)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community