Pradeep Sharma : एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा, कायमस्वरुपी जामीन मंजूर

Pradeep Sharma : लखनभैया कथित एन्काऊंटर प्रकरणात एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना ठोठावण्यात आलेल्या जन्मठेपेच्या शिक्षेत सर्वोच्च न्यायालयाने कायमस्वरूपी जामीन मंजूर केला.

189
Pradeep Sharma : एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा, कायमस्वरुपी जामीन मंजूर
Pradeep Sharma : एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा, कायमस्वरुपी जामीन मंजूर

लखनभैया कथित एन्काऊंटर प्रकरणात एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा (Pradeep Sharma) यांना ठोठावण्यात आलेल्या जन्मठेपेच्या शिक्षेत सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) कायमस्वरूपी जामीन मंजूर केला. यामुळे शर्मा (Pradeep Sharma) यांना दिलासा मिळाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने प्रदीप शर्मा (Pradeep Sharma) यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती, उच्च न्यायालयाच्या (High Courts) शिक्षेला शर्मा यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. सर्वोच्च न्यायालयाने या जन्मठेपेच्या शिक्षेत शर्मा यांना कायम जामीन मंजूर केला आहे. (Pradeep Sharma)

(हेही वाचा- Maharashtra Weather : राज्यात पुढचे ३ दिवस मुसळधार पावसाच्या सरी बरसणार!)

मुंबईतील अंधेरी (Andheri) येथे झालेल्या कथित गँगस्टर लखन लखनभैय्या हे २००६ मध्ये कथित पोलीस चकमकीत ठार झाले होते. लखनभैया (Lakhan Bhaiya) यांच्या वकील बंधूने या कथित चकमकीला न्यायालयात आव्हान दिले होते. सत्र न्यायालयाच्या आदेशानुसार, या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले होते. एन्काऊंटर स्पेशालिस्ट पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा (Pradeep Sharma) यांच्यासह १२ जणांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा खटला सत्र न्यायालयात सुरू असताना न्यायालयाने प्रदीप शर्मा (Pradeep Sharma) यांना या गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता केली होती व उर्वरित पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांना जन्मठेपेची शिक्षा सुनाविण्यात आली होती. लखनभैया (Lakhan Bhaiya) यांचे बंधू यांनी प्रदीप शर्मा (Pradeep Sharma) हे मुख्य सूत्रधार असल्याचे सांगून उच्च न्यायालयात सत्र न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान दिले होते.

न्यायालयाने सत्र न्यायालयाचा निर्णय रद्द केला

हा खटला मुंबई उच्च न्यायालयात सुरू असताना न्यायालयाने सत्र न्यायालयाचा निर्णय रद्द करून प्रदीप शर्मा (Pradeep Sharma) यांना या गुन्ह्यात दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. या शिक्षेला शर्मा यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. सर्वोच्च न्यायालयाने याचिका दाखल करून शर्मा यांना तात्पुरता दिलासा दिला होता. शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने प्रदीप शर्मा यांना कायमस्वरूपी जामीन मंजूर करून शर्मा यांना दिलासा दिला आहे. (Pradeep Sharma)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.