कर्नाटक सेक्स स्कँडल प्रकरणी निलंबित जेडीएस नेता प्रज्वल रेवन्ना (Prajwal Revanna) यांना अखेर एसआयटी पथकाने अटक केली आहे. एसआयटीच्या पथकाने त्याला बेंगळुरू विमानतळावरून ताब्यात घेतले आहे. प्रज्वल रेवण्णाला (Prajwal Revanna) आज (३१ मे) न्यायालयात हजर केले जाणार आहे. याप्रकरणी न्यायालय काय निकाल देते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रज्वल रेवन्ना सेक्स स्कॅडल प्रकरण उघड झाल्यानंतर 27 एप्रिल रोजी जर्मनीत पळून गेला होता. दरम्यान, प्रज्वल याला अटक केल्यानंतर विशेष पथकाने त्याला सीआयडी कार्यालयात नेले. रात्रभर त्याला सीआयडी ऑफिसमध्येच ठेवण्यात आले. (Prajwal Revanna)
न्यायालयात हजर करणार
प्रज्वल रेवन्ना (Prajwal Revanna) याला शुक्रवारी (३१ मे) वैद्यकीय चाचणीसाठी सरकारी रुग्णालयात नेण्यात येणार आहे. तसेच त्याला २४ तासांच्या आत न्यायालयात हजर करावे लागणार आहे. न्यायालयात एसआयटीकडून त्याची कोठडी मागण्यात येणार आहे. रिपोर्ट्सनुसार, एसआयटी प्रज्वल रेवन्नाची 14 दिवसांच्या कोठडीची मागणी करू शकते. (Prajwal Revanna)
मतदान संपल्यानंतर प्रज्वल रेवन्ना फरार
प्रज्वल रेवण्णा (Prajwal Revanna) यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र न्यायालयाने हा अर्ज फेटाळून लावला. लोकसभा निवडणुकीदरम्यान प्रज्वल रेवन्ना महिलांची छेडछाड करत असल्याचे व्हिडिओ सार्वजनिक झाले होते. यानंतर त्याच्याविरुद्ध छेडछाडीची तक्रार दाखल करण्यात आली. प्राथमिक पुरावे मिळाल्यानंतर एसआयटीने आणखी पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली. प्रज्वल रेवन्ना (Prajwal Revanna) हा हसन लोकसभा मतदारसंघातील मतदान संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी २७ एप्रिल रोजी फरार झाला होता. तो देश सोडून पळून गेला होता. यावर बरीच टीका झाली होती. त्यानंतर बेंगळुरू पोलिसांच्या विनंतीवरून इंटरपोलने प्रज्वल रेवन्ना विरोधात ब्लू कॉर्नर नोटीसही जारी केली होती. (Prajwal Revanna)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community