Prashant Koratkar चा पासपोर्ट पत्नीने पोलिसांकडे केला जमा

422
Prashant Koratkar चा पासपोर्ट पत्नीने पोलिसांकडे केला जमा
Prashant Koratkar चा पासपोर्ट पोलीस स्थानकात जमा

Prashant Koratkar : इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत (Indrajit Sawant) यांना धमकावणारा प्रशांत कोरटकर याचा पासपोर्ट त्याच्या पत्नीने कोल्हापूर पोलिसांकडे जमा केला. यामुळे तो देशाबाहेर पळाला नसल्याचे स्पष्ट झाले.  तसेच दोन वर्षांपूर्वीचे त्याच्या कौटुंबिक सहलीचे दुबईमधील फोटो व्हायरल झाल्याने तो देशाबाहेर पळाल्याच्या चर्चा सुरू होत्या. याला अखेर पूर्णविराम मिळाला. 

१८ मार्च २०२५ रोजी सत्र न्यायालयाने प्रशांत कोरटकरचा जामीन अर्ज (Prashant Koratkar’s bail application) फेटाळला. तेव्हापासून तो फरार आहे. त्याच्या शोधकामी पोलिसांची पथके नागपूर, चंद्रपूर आणि मुंबई या तीन ठिकाणी तपास करत आहेत. मात्र, पोलिसांच्या हाती काही लागले नाही. अखेर कोल्हापूर पोलिसांकडून (Kolhapur Police) शनिवार, २२ मार्च रोजी प्रशांत कोरटकर विरोधात लूकआऊट नोटीस जारी करण्यात आली आहे. तसेच कोरटकरने कुठे-कुठे विमान प्रवास केला, याबाबत ब्युरो ऑफ इम्रिगेशन यांच्याकडून माहिती घेतली जाणार आहे.

(हेही वाचा – अतिक्रमणांनी वेढलेल्या प्रभादेवीतील Matkar Marg वर झाडे बहरुन फुलपाखरेही बागडणार)

इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत (Indrajit Sawant) यांना धमकी आणि छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटरक याच्या विरोधात राजवाडा पोलिस ठाण्यात (Rajwada Police Station) गुन्हा दाखल होताच फरार झाला; पण त्याला कोल्हापूर सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळाला होता. मात्र, त्याला कोल्हापूर पोलिसांसमोर हजर होण्याचे निर्देश देण्यात आले होते. राज्य सरकारकडून कोरटकरचा अंतरिम जामीन रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेण्यात आली होती.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.