Netflix विरोधात निर्मात्याची आर्थिक गुन्हे शाखेत तक्रार, अधिकाऱ्याची ६ तास चौकशी

111
Netflix विरोधात निर्मात्याची आर्थिक गुन्हे शाखेत तक्रार, अधिकाऱ्याची ६ तास चौकशी
  • प्रतिनिधी 

नेटफ्लिक्स (Netflix) या ओटीटी प्लॅटफॉर्मवर आपले चित्रपट प्रदर्शित करुन आपली २५० कोटींची फसवणूक केल्याचा आरोप हिंदी चित्रपट निर्माते वाशू भगनानी यांनी नेटफ्लिक्स विरोधात मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेत तक्रार दाखल केली आहे. आर्थिक गुन्हे शाखेने या तक्रारीवरून प्राथमिक तपास सुरु करून नेटफ्लिक्स कंपनीच्या अधिकारी विभा चोप्रा यांची दि. ७ ऑक्टोबर आणि दि. ८ ऑक्टोबर रोजी चौकशी करण्यात आली आहे.

(हेही वाचा – Shiv Sena : बाळासाहेबांचा विश्वासू सेवेकरी राहिलेल्या व्यक्तीवर शिवसेनेने सोपवली ‘ही’ जबाबदारी)

नेटफ्लिक्सच्या (Netflix) हिंदी चित्रपट परवाना विभागाच्या प्रमुख विभा चोप्रा यांनी आपले म्हणणे आर्थिक गुन्हे शाखेकडे नोंदवले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार, निर्माता वाशू भगनानी यांनी सप्टेंबर २०२२ मध्ये तीन चित्रपटांच्या निर्मितीसाठी नेटफ्लिक्ससोबत (Netflix) करार केला होता. विभा चोप्राने तिच्या विधानादरम्यान दावा केला आहे की, ती ऑक्टोबर २०२३ पासून नेटफ्लिक्समध्ये हिंदी चित्रपट परवाना प्रमुख म्हणून काम करत आहे. तीन चित्रपटांच्या निर्मितीसाठी नेटफ्लिक्सने वाशू भगनानीला २०० कोटी रुपये देण्याचे आश्वासन दिले होते.

(हेही वाचा – Dhangar Reservation साठी मंत्रालयात आंदोलन)

चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर उर्वरित १०० कोटी नफ्यातून दिले जातील, असे मान्य करण्यात आले. मात्र, नेटफ्लिक्सने (Netflix) केवळ वाशू भगनानीला ६० कोटी रुपये दिले. याव्यतिरिक्त, नेटफ्लिक्सने भगनानीच्या हिरो नंबर १ चित्रपटाचा परवाना रद्द केला, परिणामी त्याला २०० कोटींचे नुकसान झाले. या प्रकरणी मुंबई आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा प्राथमिक तपास सुरु केला असून दि. ७ ऑक्टोबर रोजी नेटफ्लिक्सच्या (Netflix) विभा चोप्रा यांना चौकशीसाठी आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात बोलविण्यात आले होते. दि. ७ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता विभा चोप्रा ह्या आर्थिक गुन्हे शाखेत चौकशीकामी आलेल्या होत्या, त्यांची सहा तास चौकशी करून त्यांचे म्हणणे नोंदविण्यात आले, अशी माहिती पोलिसांनी दिली.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.