Pune Accident: पुण्यात अल्पवयीन मुलाने टँकर चालवला, पती-पत्नीसह अनेकांना उडवलं; कशी घडली घटना? वाचा सविस्तर…

शहरातील वानवाडी परिसरात शनिवारी पहाटे साडेसहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.

243
Pune Accident: पुण्यात अल्पवयीन मुलाने टँकर चालवला, पती-पत्नीसह अनेकांना उडवलं; कशी घडली घटना? वाचा सविस्तर...

पुणे शहरातील (Pune Accident) पोर्शे कार अपघाताची घटना ताजी असतानाच आता पुन्हा अशाच प्रकारची एक संतापजनक घटना घडली आहे. एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलाने सुसाट वेगाने टँकर चालवत अनेकांना उडवलंय. या अपघातात दुचाकीस्वार पती-पत्नीसह व्यायामासाठी निघालेली लहान मुलेही जखमी झाली आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

शहरातील वानवाडी परिसरात शनिवारी पहाटे साडेसहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. या घटनेनं परिसरातून संताप व्यक्त केला जात आहे. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, पुणे महापालिकेचे अधिकारी संतोष ढुमे आणि त्यांच्या पत्नी हे दुचाकीवरून वानवाडी परिसरातून जात होते.

(हेही वाचा – Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; ७ जणांचा जागीच मृत्यू, ४ जखमी! )

…आणि नागरिकांनी टँकर अडवून धरला
त्यांच्या तालमीत शिकणाऱ्या मुली व्यायामासाठी रस्त्यावरून धावत होत्या. त्याचवेळी अचानक पाठीमागून भरधाव वेगात एक टँकर आला. काही क्षणातच या टँकरने ढुमे यांच्या दुचाकीला धडक दिली. ही धडक इतकी जबर होती, की ढुमे यांच्या पत्नी दुचाकीवरून खाली कोसळल्या. दैव बलवंतर असल्याने त्यांच्या अंगावरून टँकरचे चाक गेले नाही. पुढे या टँकरने मॉर्निंग वॉकला निघालेल्या लहान मुलांनाही धडक दिली. या अपघातात काही मुले आणि महिला जखमी झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या अपघाताला कारणीभूत ठरलेला टँकर अवघ्या १४ वर्षांचा मुलगा चालवीत होता. अपघातानंतर नागरिकांनी हा टँकर अडवून धरला तसेच चालकाला पकडून ठेवले.

पोलिसांकडून गुन्हा दाखल
या अपघाताची माहिती पोलिसांना देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अल्पवयीन मुलासह त्याच्या वडिलांना ताब्यात घेण्यात आलं आहे. याप्रकरणी पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.