Pune Accident: नवले पुलावर कारची बसला धडक ; दोघांचा मृत्यू तर 4 जण जखमी

93
Pune Accident: नवले पुलावर कारची बसला धडक ; दोघांचा मृत्यू तर 4 जण जखमी
Pune Accident: नवले पुलावर कारची बसला धडक ; दोघांचा मृत्यू तर 4 जण जखमी

पुण्यातील (Pune Accident) नवले पुलावर (Navle bridge) पहाटे झालेल्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू तर 4 जण जखमी झाले आहेत. स्विफ्ट कारने (Swift car) (एमएच १२ केडब्ल्यू ३६६३) उभ्या असलेल्या बसला मागून धडक दिल्याने हा अपघात झाला. शनिवारी (25 जाने.) पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास बाह्यवळण महामार्गावर वडगाव ब्रिजजवळ थांबलेल्या बसला मागून येणाऱ्या स्विफ्ट कारने जोरदार धडक दिल्यामुळे भीषण अपघात झाला आहे. (Pune Accident)

हेही वाचा-‘जम्बो मेगाब्लॉक’मुळे Western Railway चे प्रवासी खोळंबले ; अंधेरी, बोरीवली स्थानकांवर तुफान गर्दी

वाढदिवसाची पार्टीवरून परतत असलेल्या या कारमधील सहापैकी दोन तरूणांना जागीच मृत्यू झाला आहे. तर कारमधील इतर तरूणांना अपघातानंतर नवले हॉस्पिटल व तिथून पुढील खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत पुढील तपास सुरू केला आहे. (Pune Accident)

हेही वाचा-भविष्यात एसटीची बसस्थानके सुंदर व आकर्षक करण्यासाठी वास्तुविशारदांनी आपले योगदान द्यावे; Pratap Sarnaik यांचे आवाहन

पोलिसांनी जखमींना जवळच्या स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे. सर्वांवर उपचार सुरू आहे. मित्राच्या वाढदिवसाला गेलेल्या तरुणांचा अशाप्रकारे दुर्दैवी अंत झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेची दखल पोलिसांनी घेतली आहे. ज्यावेळी अपघात घडला तेव्हा कारचा चालकाने मद्य प्राशन केलं होतं का? हा अपघात नेमका कशामुळे झाला? याचा शोध पोलीस घेत आहेत. (Pune Accident)

जखमींची नावे- (Pune Accident)

सोहम खळे-वय 19
आयुष काटे- वय 20
अथर्व झेडगे-वय 19
प्रतीक बंडगर-वय 19
हर्ष वरे- वय 19

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.