Pune Accident Case : पुणे अपघात प्रकरणाबाबत राष्ट्रवादीच्या नेत्याच्या पत्नीने केलेल्या ‘या’ ट्विटची चर्चा, धक्कादायक माहिती उघड

या अपघात प्रकारणातील काही मुलं आणि सोनाली तनपुरे यांचा मुलगा एकाच वर्गात शिकत होते.

341
Pune Accident Case : पुणे अपघात प्रकरणाबाबत राष्ट्रवादीच्या नेत्याच्या पत्नीने केलेल्या 'या' ट्विटची चर्चा, धक्कादायक माहिती उघड

पुण्यातील कल्याणीनगर कार अपघातात २ अभियंत्यांना आपला जीव गमवावा लागला. नामवंत बिल्डरच्या अल्पवयीन मुलाने मद्यधुंद अवस्थेत भरधाव वेगाने कार चालवली आणि बाईकवरील दोघांना धडक दिली. यामध्ये एक तरुण आणि एका तरुणीचा मृत्यू झाला. या घटनेचे पडसाद राज्यभरात उमटले असून रोज नवीन माहिती समोर येत आहे. ‘X’वर केलेल्या पोस्टमुळे आणखी एक धक्कादायक माहिती उघड झाली आहे. (Pune Accident Case)

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते प्राजक्त तनपुरे यांची पत्नी सोनाली तनपुरे यांनी या घटनेसंदर्भात ट्विट केलं आहे. त्याची चर्चा सुरू आहे. त्यांनी म्हटलं आहे की, ‘कल्याणीनगर येथील कार अॅक्सिडंटनंतर पुन्हा एकदा त्या गोष्टी आठवल्या. संबंधित घटनेतील मुलगा हा माझ्या मुलासोबत एकाच वर्गात शिकत होता. त्यावेळी त्यापैकी काही मुलांकडून माझ्या मुलाला खूप त्रास झाला होता. या मुलांची तक्रार मी त्यांच्या पालकांकडे केली होती.’ (Pune Accident Case)

(हेही वाचा –Pune Car Accident: “अख्खी अग्रवाल फॅमिली क्रिमीनल!” अजय भोसलेंवर निवडणुकीच्या प्रचारावेळी गोळी का झाडली? )

या अपघात प्रकारणातील काही मुलं आणि सोनाली तनपुरे यांचा मुलगा एकाच वर्गात शिकत होते. त्यापैकी काही मुलांकडून माझ्या मुलाला खूप त्रास झाला होता, असे सोनाली सोशल मीडियावरील पोस्टमध्ये त्यांनी लिहिले आहे. त्या मुलांमुळे माझ्या मुलाला शाळादेखील सोडावी लागली. वाईट प्रवृत्ती असणाऱ्या मुलांची वेळीच दखल घेतली गेल असती, तर असा भयंकर गुन्हा कदाचित घडला नसता, असेही सोनाली यांनी नमूद केले आहे.

ज्युवेनाईल बोर्डासमोर हजर करणार
भरधाव वेगाने कार चालवून दोघांच्या मृत्यूसाठी जबाबदार ठरलेल्या या अल्पवयीन आरोपीला बुधवार, (२२ मे) ज्युवेनाईल बोर्डासमोर हजर करण्यात येणार आहे. आरोपी मुलासह त्याच्या पालकांनाही हजर राहण्याचे आदेश बोर्डाने दिले आहेत. ज्युवेनाईल बोर्डासमोर बुधवारी सुनावणी होऊन बोर्ड आदेश देणार आहे. मंगळवारी, (२१मे) गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदेश दिल्यानंतर पुणे पोलिसांनी ज्युवेनाईल बोर्डाकडे धाव घेतली. आरोपी मुलगा अल्पवयीन असल्यामुळे त्याला तात्काळ जामीन मंजूर झाला होता, मात्र बुधवारी ज्युवेनाईल बोर्ड नेमका काय आदेश देतो ते पाहणं महत्त्वाचे आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.