Pune Accident : पुणे हिट अँड रन प्रकरणी विशाल अग्रवालला जामीन मंजूर!

91
Pune Accident : पुणे हिट अँड रन प्रकरणी विशाल अग्रवालला जामीन मंजूर!
Pune Accident : पुणे हिट अँड रन प्रकरणी विशाल अग्रवालला जामीन मंजूर!

पुणे हिट अँड रन प्रकरणी (Pune Accident) मोठी बातमी समोर येत आहे. पुण्याच्या कल्याणी नगर येथील अपघात प्रकरणातील मुख्य अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रवाल (Vishal Agarwal) याला जामीन मंजूर झाला आहे. पुणे सत्र न्यायालयाने काही अटीशर्तींवर विशाल अग्रवालला जामीन मंजूर केला आहे. विशाल अग्रवालला आज जामीन मंजूर झाला असला तरी त्याला तपास यंत्रणांना सहकार्य करावं लागणार आहे. याच अटीच्या आधारावर विशाल अग्रवालला जामीन मंजूर करण्यात आला आहे. (Pune Accident)

प्रकरण काय?

पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आणि ब्रम्हा कॉर्पचे संचालक विशाल अग्रवाल यांच्या मुलगा विशालने मध्यरात्री आपल्या भरधाव कारने दोघांना चिरडले. शहरातील कल्याणीनगर येथील परिसरात ही दुर्घटना घडली. या घटनेनंतर संतप्त जमाने वाहनचलाक वेदांतला पकडून चोप दिला. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्याने त्यास अटक करण्यात आली होती. (Pune Accident)

गुन्हा दाखल झाल्यानंतर विशाल अग्रवाल झाले होते फरार

पुणे अपघातप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल पसार झाल्याची माहिती होती. पोलिसांकडून त्याचा शोध सुरू होता. पुण्यातील ब्रम्हा कॉर्प या बांधकाम उद्योग समूहाचे प्रमुख विशाल अग्रवाल पोलिसांना सापडत नसल्याने त्यांना शोधण्यासाठी पोलीस पथके विविध ठिकाणी रवाना करण्यात आली होती. अखेर पुणे पोलिसांनी अल्पवयीन मुलाचे वडील विशाल यांना संभाजीनगरमधून अटक केली. (Pune Accident)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.