Pune Accident: फरार बिल्डर विशाल अग्रवाल अखेर पोलिसांच्या ताब्यात!

231
Pune Accident: फरार बिल्डर विशाल अग्रवाल अखेर पोलिसांच्या ताब्यात!
Pune Accident: फरार बिल्डर विशाल अग्रवाल अखेर पोलिसांच्या ताब्यात!

कल्याणीनगर परिसरात पोर्शे कारने दोघांना चिरडणाऱ्या (Pune Accident) वेदांत अग्रवाल (Vedant Agrawal) याचे वडील आणि पुण्यातील बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. पुणे पोलिसांकडून विशाल अग्रवाल (Vishal Agrawal) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर विशाल अग्रवाल फरार झाले होते. (Pune Accident)

विशाल अग्रवाल पोलिसांच्या ताब्यात

पुणे पोलिसांनी त्यांच्या तपासासाठी अनेक पथकं तयार केली होती. अखेर पुणे पोलिसांच्या (Pune Police) गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी (२१ मे) पहाटे छत्रपती संभाजीनगरमधून विशाल अग्रवाल यांना ताब्यात घेतले आहे. विशाल अग्रवाल यांना दुपारपर्यंत पुण्यात आणण्यात येईल. विशाल अग्रवाल यांच्यावर अटकेची कारवाई केल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर केले जाईल. (Pune Accident)

नेमकं प्रकरण काय ?

वेदांत अग्रवाल हा अल्पवयीन होता. त्याने पोर्शे कारने दोघांना चिरडल्यानंतर (Pune Accident) पुण्यात प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत होता. यानंतर पोलिसांनी वडील विशाल अग्रवाल यांच्यावरही गुन्हा दाखल केला होता. मुलगा अल्पवयीन असूनही त्याला कार (Porsche car) चालवायला दिल्याबद्दल विशाल अग्रवाल यांच्यावर मोटर वाहन अधिनियमाच्या कलम 3, 5 आणि 199 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच आपला अल्पवयीन मुलगा दारू पितो हे ठाऊक असूनही त्याला पार्टी करण्यास परवानगी दिल्याबद्दल विशाल अग्रवाल यांच्यावर बाल न्याय अधिनियमनाच्या कलम 75 आणि 77 अंतर्गत आखणी एक गुन्हा दाखल करण्यात आला. यामुळे विशाल अग्रवाल यांच्या अडचणी वाढल्या होत्या. यानंतर ते फरार झाले होते. (Pune Accident)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.