पुण्यात एका बड्या पोलीस अधिकाऱ्याने आपल्या पत्नी आणि पुतण्याची हत्या करुन स्वतः आत्महत्या केली आहे. हा सगळा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरु केला आहे.
अमरावती पोलीस दलातील सहाय्यक पोलीस आयुक्त भरत गायकवाड यांनी पुण्यात बाणेर येथे राहणाऱ्या पत्नीचा आणि पुतण्याचा गोळी झाडून खून केला आहे. मोनी गायकवाड (वय ४४), पुतण्या दीपक गायकवाड (वय ३५) अशी गोळी झाडून खून केलेल्या दोघांची नावे आहेत. खुनानंतर भरत गायकवाड यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्याही केली. पहाटे चार वाजण्याच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. स्थानिक पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहे.
(हेही वाचा – अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे तातडीने पंचनामे करा – मुख्यमंत्री शिंदे)
ही धक्कादायक घटना चतुश्रुंगी परिसरात घडली. गायकवाड यांनी २ हत्या करण्यासाठी आणि नंतर आत्महत्या करण्यासाठी स्वतःचे सरकारी सेवेतील शस्त्र वापरले. गोळीबाराची घटना आज (सोमवार २४ जुलै) पहाटे ४ वाजेच्या सुमारास घडली आहे.
अमरावती पोलिस दलात कार्यरत असलेले एसीपी भरत गायकवाड हे पुण्यातील चतुश्रुंगी पोलीस स्टेशनच्या हद्दीत वास्तव्यास होते. ते सुट्टीसाठी अलिकडेच पुण्यात आले होते. त्यांनी पत्नी आणि पुतण्याची हत्या करून नंतर आत्महत्या केली. एसीपी भरत गायकवाड यांनी धक्कादायक कृती करण्याआधी चिठ्ठी वगैरे लिहून ठेवलेली नाही. यामुळे या घटनेमागचे कारण अद्याप समजलेले नाही. पण कुठल्यातरी मुद्यावरून कुटुंबात वाद सुरू होता अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे. या प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community