दहशतवाद पथकाने(एटीएस) पुणे जिल्ह्यातील नारायण गावात आठ बांगलादेशी नागरिकांना बेकायदेशीरपणे वास्तव्य केल्याप्रकरणी त्यांना ताब्यात घेतले आहे. या नागरिकांच्या विरोधात नारायणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (ATS Raid )
नारायण गांव परिसरात बांगलादेशी नागरिक बेकायदेशीररित्या राहत होते अशी माहिती एटीएसच्या पुणे पथकाला मिळाली होती. त्यानुसार गुरुवारी (१४ डिसेंबर) नारायणगावात छापेमारी करून त्यांनी 8 बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडे कोणतेही अधिकृत कागदपत्र नव्हते तरीही ते इथे वास्तव्यास होते. तसेच भारत-बांगलादेशी सीमेवरील मुलकी आधिकाऱ्यांच्या परवानगी शिवाय भारतात घुसखोरी करून अवैध वास्तव्य केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
(हेही वाचा : Anti-Love Jihad Law : ‘लव्ह जिहादविरोधी कायद्या’विषयी शासन अत्यंत गंभीर; लवकरच निर्णय – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे)
मेहबुल नजरून शेख, राणा जमातअली मंडल ,गफुर राजेवली शेख, आलमगीर जमातअली मंडल, शालोम मुस्तफीजुर मंडल, अफजल हमिबुल खान, कबीर मुज्जाम मुल्ला, जमातअली व्हायतअली मंडल (फरार) (सर्व सध्या रा. नारायणगाव, पुणे मुळ राहणार बांग्लादेश ) अशी आरोपींची नावे आहेत.तसेच पाच दिवसांपूर्वी राष्ट्रीय तपास यंत्रणा ( NIA)आणि राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (ATS)संयुक्त कारवाई करत पुणे,ठाणे परिसरात आयसीस मॉड्युलच्या संदर्भात १५ जणांवर कारवाई केली आहे. तर पुण्यातील कोंढव्यातील दोघांची चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर आता एटीएसने बेकायदा वास्तव्य करणाऱ्या बांग्लादेशी विरुद्ध कारवाईचा बडगा उगारला आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community