Pune Bomb Threat: पुण्यातील डी. वाय. पाटील कॉलेजमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी; घटनास्थळी बॉम्ब शोधक पथक दाखल

129
Pune Bomb Threat : विद्येचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात मागील अनेक दिवसांपासून गुन्हेगारी स्वरूपाच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. अशातच आकुर्डी येथील डी. वाय. पाटील कॉलेजमध्ये (D. Y. Patil College Bomb threat) बॉम्ब ठेवल्याचा ई-मेल (Fake Bomb Threat) प्राप्त झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. हा मेल  मंगळवारी सकाळी साडेआठच्या सुमारास कॉलेज प्रशासनाला मिळाला, त्यानंतर तातडीने पोलिसांना याची माहिती देण्यात आली. याची तातडीने दखल घेत मोठ्या प्रमाणावर पोलिस फौजफाटा कॉलेजमध्ये पाठवण्यात आला. बॉम्ब शोधक/नाशक पथक (BDDS) आणि श्वानपथकाच्या मदतीने संपूर्ण कॉलेजची कसून झडती घेतली. मात्र, पाच ते सहा तास तपास केल्यानंतर हा ई-मेल पूर्णपणे खोटा असल्याचे निष्पन्न झाले. (Pune Bomb Threat)

(हेही वाचा – IPL 2025 : आयपीएलमध्ये तंबाखू किंवा दारूच्या जाहिरातींवर बीसीसीआयची बंदी?)

मिळलेल्या माहीतीनुसार, महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरु असल्यानं परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. बॉम्ब संदर्भातील ईमेलनंतर विद्यार्थ्यांना वर्गातून बाहेर काढण्यात आल्याने सर्व विद्यार्थ्यांचा एकत्रच गोंधळ झाल्याचंही दिसून आलं. सकाळी साडे अकराच्या सुमारास हा ई-मेल येताच पोलिसांच्या कंट्रोल रुमला महाविद्यालय प्रशासनाकडून ही माहिती देण्यात आली. त्यानंतर, बिडीडीएसचं पथक तातडीनं महाविद्यालयात पोहचलं, गेल्या तीन तासांपासून बॉम्बस्कॉड (Bombscod)  पथकाडून तपासणी व शोधमोहिम सुरू होती. या शोधकार्यात संपूर्ण महाविद्यालय परिसरात कुठेही बॉम्बसदृश्य वस्तू आढळली नाही. त्यामुळे अज्ञाताने हा खोडसाळपणा केल्याचं स्पष्ट झालं आहे. पोलिसांच्या शोधमोहिमेनंतर खोडसाळपणाचे स्पष्ट होताच सर्वांचा जीव भांड्यात पडला. दरम्यान, पिंपरी चिंचवड पोलिसांकडून ई-मेल पाठवणाऱ्या या अज्ञाताचा शोध सुरु आहे.

(हेही वाचा – Assam Government निर्माण करणार स्वतःचा उपग्रह; इस्रोशी चर्चा सुरु, मुख्यमंत्र्यांची माहिती)

यापूर्वीही मिळाले होते फेक मेल
यापूर्वीही अशा स्वरूपाचे धमकीचे मेल शाळा, रुग्णालये आणि महाविद्यालयांना मिळाले आहेत. त्यावेळीही कोणतीही संशयास्पद वस्तू सापडली नव्हती. त्यामुळे कोणीतरी खोडसाळपणा करत असल्याचा संशय पोलिसांना आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी सायबर सेल आणि गुन्हे शाखेच्या विशेष पथकातील कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.